आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामी पक्षाचा अध्यक्ष होऊ शकत नाही. दिल्लीत बसणाऱ्या, लोकसभा राज्यसभेत काम करणाऱ्या आणि संसदेत बसून देश पाहणाऱ्या व्यक्तीने अशा जबाबदाऱ्या घ्यायच्या असतात. अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडली.
शरद पवारांची बहीण सरोज पाटील यांनी अध्यक्षपदासाठी जयंत पाटलांचे नाव सूचवल्यानंतर आज मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिका मांडली.
काय म्हणाले जयंत पाटील?
जयंत पाटील म्हणाले, "माईंनी अर्थात सरोज पाटील ज्या दिवंगत एनडी पाटील यांच्या पत्नी आहेत. त्यांनी माझं नाव जरी घेतलेलं असलं तरी मी महाराष्ट्रात काम करतो आहे. महाराष्ट्र सोडून दिल्लीची जबाबदारी घ्यायची म्हटलं तर दुसऱ्या राज्यात माझ्या ओळखीही नाहीत.
माझा संपर्कही दुसऱ्या राज्यांत नाही. त्यामुळं दिल्लीत बसणाऱ्या, लोकसभेत-राज्यसभेत काम करणाऱ्या आणि देश काही वर्षे संसदेत बसून बघणाऱ्या व्यक्तीनं अशा जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. पवारांना तो अनुभव आहे, त्यामुळं ते यशस्वीपणानं देशभरात राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचं काम केलं आहे. आज अनेक वर्षांचा पवारांना अनुभव असल्यानं त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. विविध राज्यातील लोक त्यांच्या विश्वासापोटी या पक्षात आले आहेत"
पवार त्यांच्या निर्णयावर ठाम
पवार साहेबांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा अनुभव आहे. म्हणून त्यांना देशभर पक्षाचे काम पाहता आले. वेगवेगळया राज्यातले लोक या पक्षात आलेली आहेत. पवार त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांना फेरविचार करण्याची विनंती केली आहे. पण पक्ष पुढे वाढवण्यासाठी काही पावले आवश्यक असल्याची त्यांची भूमिका दिसते. मला सगळ्यात जास्त काळजी आहे. त्यामुळे पवारांनी 2024 च्या लोकसभेपर्यंत, विधानसभेपर्यंत अध्यक्षपद स्वत:कडे ठेवावे, असेही जयंत पाटील म्हणाले.
पक्षकार्यालयात बरेच राजीनामे
माझ्याकडे पक्षकार्यालयात बरेच राजीनामे आलेले आहेत. काहींनी मोबाईलवरही राजीनामे आलेले आहेत. पवारांच्या राजीनाम्यामुळे राजीनामे दिलेले आहेत. पवार नसताना आपल्याला न्याय मिळेल का अशी त्यामागे भावना आहे. पदाधिकाऱ्यांची आम्ही समजूत काढू.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.