आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Jayant Patil Said On PetrolDisel Price | Prime Minister Narendra Modi, Petrol Has Gone Up To Rs 118 Per Liter And Diesel To Rs 100 Per Liter. In The Next Few Days It Will Be Rs 150, Said Jayant Patil! | Marathi News

इंधनवाढ सुरूच:मोदींच्या कृपेमुळे सध्या पेट्रोल 118 रुपयांवर गेले, पुढच्या काही दिवसांत 150 रुपये सुद्धा होईल; जयंत पाटलांची खोचक टीका

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ केली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची गेल्या पंधरा दिवसांतील ही तेरावी वेळ आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरांत सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसत आहे. त्यावरुन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी इंधनवाढीवरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृपेमुळे पुढच्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेल 150 रुपये सुद्धा होईल" अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर केली आहे.

देशात सर्वत्र पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे. त्यावरुन विरोधक सत्ताधारी भाजपवर आक्रमक झाले आहेत. गेल्या पंधरा दिवसांत पेट्रोल-डिझेल तेरा वेळा महागले आहे. त्यावरुन राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृपेमुळे सध्या पेट्रोल प्रति लिटर 118 आणि डिझेलही शंभर रुपयांवर गेले आहे. पुढच्या काही दिवसांत 150 रुपये सुद्धा होईल." असे म्हणत जयंत पाटलांनी मोदींवर टीका केली आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे. जाणून घेऊया राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर...

आज महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर किती?

देशातील सर्व राज्यांप्रमाणेच आज महाराष्ट्रातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. देशात सर्वात महाग पेट्रोल परभणी जिल्ह्यात विकले जाते. आज झालेल्या दरवाढीनंतर परभणीत एक लिटर पेट्रोलचे दर 122.01 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर 104.62 रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे. मुंबई शहरात आज पेट्रोलचा दर 84 पैशांनी वाढून 119.67 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 85 पैशांनी वाढून 103.92 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर पुण्यात आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 119.07 रुपये तर डिझेलचा दर 101.78 रुपयांवर पोहोचला आहे. नाशिकमध्ये आज पेट्रोलचा दर 119.11 रुपये तर डिझेलचा दर 101.83 रुपये प्रति लिटर झाला आहे. नागपुरात आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 119.33 रुपये तर डिझेलचा दर 102.07 रुपये प्रति लिटर झाला आहे. कोल्हापुरात आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 119.69 रुपये तर डिझेलचा दर 102.41 रुपयांवर पोहोचला आहे.

शहरं पेट्रोलचे दर (प्रति लिटर) डिझेलचे दर (प्रति लिटर)
मुंबई 119.67 रुपये 103.92 रुपये
पुणे 119.07 रुपये 101.78 रुपये
नाशिक 119.11 रुपये 101.83 रुपये
परभणी 122.01 रुपये 104.62 रुपये
औरंगाबाद 119.97 रुपये 102.65 रुपये
कोल्हापूर 119.69 रुपये 102.41 रुपये
नागपूर 119.33 रुपये 102.07 रुपये

बातम्या आणखी आहेत...