आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निषेध:कर्नाटकातील सीमावासियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हाताला काळ्या फिती लावून निषेध, जयंत पाटील म्हणतात...

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव व सीमाभागामध्ये 1 नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळण्यात येतो.

कर्नाटकमधील सीमावासियावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी हाताला काळ्या फिती लावून निषेध केला आहे. राज्यातील सर्व राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते आज हाताला काळ्या फिती लावून कर्नाटक सरकारचा निषेध करत असल्याचे जयंत पाटलांनी सांगितले आहे.

बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव व सीमाभागामध्ये 1 नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळण्यात येतो. आता सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे पूर्ण मंत्रिमंडळ आज 1 नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधून काम करत आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष , जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आपल्या हाताला काळी फित बांधून कामकाजाला सुरुवात केली आहे.

याविषयावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ' कर्नाटकमधील मराठी सीमावासियांवर होणारे अत्याचार, अन्याय, जुलूम याचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आपल्या हाताला काळी फिती बांधून निषेध व्यक्त करत आहे. महाराष्ट्र सरकारमधील सर्व याचा निषेध व्यक्त करत आहे. महाराष्ट्रातील कर्नाटकातील सीमा प्रांतात अडलेल्या लोकांच्या पूर्ण ताकदीने सरकार त्यांच्या मागे उभे आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांना पाठिंबा म्हणून काळी फित बांधत कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा आम्ही निषेध करत आहोत. बेळगाव मधील मराठी भाषिकांचा विजय होईल, याचा आम्हाला विश्वास आहे.'