आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशरद पवारांना पर्याय नाही, राष्ट्रवादीच्या समितीच्या बैठकीत कार्याध्यक्ष पदाचा कोणताही प्रस्ताव नव्हता. आम्ही सगळ्यांनी शरद पवारच अध्यक्षपदी रहावेत असा ठराव केला असल्याचे जयंत पाटील यांनी माध्यमांना सांगितले.
शरद पवारांचा राजीनामा समितीने फेटाळल्यानंतर राज्याचे लक्ष पवारांच्या अंतीम निर्णयाकडे लागून आहे.
राजीनामा एकमताने फेटाळला
शरद पवारांचा राजीनामा १५ सदस्यीय बैठकीत फेटाळण्यात आला. समितीच्या या निर्णयाला काहीजणांनी विरोध केला का? असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, समितीच्या निर्णयाला कोणीही विरोध केला नाही. एकमताने राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. काश्मीर ते कन्याकुमारीतील प्रतिनिधी आणि पक्षातील देशातील वेगवेगळया पक्षाच्या अध्यक्षांनी, विविध देशातील नेत्यांनी लोकसभा, विधानसभाच्या पार्श्वभूमीवर आताच हा निर्णय योग्य नसल्याचे देशातील अनेकांनी पवारांना सांगितले. त्यांनंतर आम्ही पवारच अध्यक्षपदी रहावेत असा ठराव केला असल्याचेही ते म्हणाले.
देशातल्या नेत्यांशी बोलून...
जयंत पाटील म्हणाले, पी. सी. चाको यांनी वेगवेगळ्या राज्यात पवार साहेबांनी राजीनामा देऊ नये, असे लोक आग्रहाने कशी मागणी करत आहेत, याची माहिती दिली. काश्मीर ते कन्यापूर, नागालँड, मणिपूर, केरळ, कर्नाटक, मध्यप्रदेश, बिहार इथल्या प्रतिनिधींनी चाको आणि आमच्या वरिष्ठांना आग्रहाने सांगितले. फारुक अब्दुल्ला पासून देसातल्या विविध पक्षांच्या नेत्यांनी सध्या लोकसभा निवडणुका होईपर्यंत राजीनाम्याचा निर्णय घेऊ नका असे सांगितले.
आमच्या पक्षातल्या वरिष्ठांनाही त्यांनी फोन करून सांगितले. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी शरद पवारच अध्यक्षपदी रहावेत असा ठराव केला. पवार साहेबांना पर्याय नाही. त्यांच्या नावाने आम्ही ठराव केला आहे. कार्याध्यक्ष पदाचा प्रस्ताव नव्हता.
महाविकास आघाडी अभेद्यच
काल संध्याकाळी मी सरद पवारांशी चर्चा केली. तोपर्यंत ते त्यांच्या निर्णयावर ठाम होते. पवार साहेब बाजूला होणे हाच मुळात धक्का होता. कार्यकर्ते अस्वस्थ होते. महाविकास आघाडी अभेद्यच राहिल.असेही जयंत पाटील म्हणाले.
विचार करायला आणखी वेळ हवा
राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांची बैठक झाली. सर्वांशी चर्चा करून समितीने पवारांचा राजीनामा फेटाळला. दरम्यान, पवारांना समितीचा निर्णय कळवण्यात आला आहे. या ठरावावर विचार करण्यास आणखी वेळ हवा असल्याचे सांगितले असल्याचे प्रफूल पटेल यांनी माध्यमांना सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.