आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Jayant Patil's Letter To Chief Minister Eknath Shinde| A Demand Of Arrange A Special Local Train For Ganesh Devotees | Discussing With Central Goverment

जयंत पाटलांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र:केंद्राशी चर्चा करून गणेश भक्तांसाठी विशेष लोकल ट्रेनची व्यवस्था करण्याची मागणी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवाच्या काळात रात्री उशिरा दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भक्तांचे हाल लक्षात घेता राज्यसरकारने केंद्रसरकारशी चर्चा करून शेवटच्या लोकल ट्रेननंतर काही विशेष रेल्वे लोकल सेवा सुरु कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

दरम्यान याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जयंत पाटील यांनी पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे, आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे मागील बुधवारी आगमन झाले आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. कोविडचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने तब्बल दोन वर्षांनंतर आपण हा उत्सव निर्बंधांशिवाय साजरा करत आहोत.

भाविक 8-8 तास रांगेत

मुंबईत गणेशोत्सवाची शान काही औरच असते याची कल्पना आपल्याला असेलच. श्री सिद्धीविनायक मंदिर, लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळ, चिंचपोकळीचा चिंतामणी, जी.एस.बी मंडळ, गिरगावचा राजा अशा अनेक प्रसिद्ध गणपतींचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत असतात. नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी तर भाविक, रात्र आणि दिवसही न पाहता 8-8 तास रांगेत उभे असतात. रात्री उशिरा दर्शन घेऊन परतल्यानंतर त्यांना पहाटेची पहिली रेल्वे लोकल मिळेपर्यंत वाट पहावी लागते.

गणेशभक्तांना दिलासा द्या

पुढे ते म्हणाले, अशा परिस्थितीत आपण केंद्र शासनाशी चर्चा करून रात्री शेवटच्या रेल्वे लोकलनंतरही भाविकांसाठी काही विशेष रेल्वे लोकल सेवा सुरु करण्याबाबत विनंती करावी. जेणेकरून गणेशभक्तांना दिलासा मिळेल. आपले सण, संस्कृती, उत्सव जपण्याचे अधिकार राज्यातील प्रत्येक नागरिकाला आहेच. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची काळजी घेणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...