आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडीची राऊतांवर कारवाई:सत्ताधाऱ्यांना बदनाम करणे चुकीचे, संजय राऊतांच्या कारवाईवर जयंत पाटील यांचे वक्तव्य

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

संजय राऊत यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी जर ईडीच्या कारवाईवर आपले मत व्यक्त केले तर ते आपण विचारात घ्यायला हवे असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तर नाना पटोले यांनी केंद्र सरकारकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका केंद्र सरकारवर केली आहे.

नेमके काय म्हणाले जयंत पाटील?
सरकार आणि सरकारशी संबंधित व्यक्तींना बदनाम करण्याचे काम सध्या सुरू आहे. सत्ताधाऱ्यांना बदनामत करणे चुकीचे आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. भाजपकडून विरोधकांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. केंद्रीय यंत्रणा किरीट सोमय्या ना सांगून सगळे काही करतात, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी जर ईडीच्या कारवाईवर आपले मत व्यक्त केले तर ते आपण विचारात घ्यायला हवे असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ईडी किरीट सोमय्यांना सांगून सर्व काही करते अशी टीका देखील जयंत पाटील यांनी केली आहे. तर राज्यात आगामी काळातील निवडणुकामध्ये दंगलीचा प्रयत्न होऊ शकतो, असा दावाही जयंत पाटील यांनी यावेळी केला आहे.

केंद्र सरकारकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न - पटोले
संजय राऊतांवर करण्यात आलेल्या कारवाईवरून नाना पटोलेंनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्र सरकारकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र राज्य सरकारवर यांचा काहीच परिनाम होणार नाही. ईडीच्या माध्यमातून भाजपकडून विरोधकांना ब्लॅकमेलिंग सुरू आहे. असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. तर केंद्र सरकारकडून दहशतवादी कृत्ये सुरू आहेत, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

नेमके काय आहे संजय राऊत प्रकरण?
मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यातून वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर 12 वर्षांपूर्वी 50 लाख जमा करण्यात आले होते. त्याबाबत ईडीकडून त्यांच्याकडे गेल्या दीड महिन्यापासून विचारणा सुरू होती. संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रवीण राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत असून पत्राचाळ घोटाळ्यातील पैशातून अलिबागमध्ये जमीन खरेदी करण्यात आल्याचा संशय ईडीला होता. याच अंतर्गत ईडीने आज मोठी कारवाई करत संजय राऊतांना दणका दिला आहे.

राऊतांच्या भाषा, संस्कृतीचे दर्शन घडतेय -चंद्रकांत पाटील

तुम्ही भ्रष्ट्राचार केला नसेल तर घाबरता कशाला?, कोर्टात जा. असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतंना दिला आहे. संजय राऊतांची भाषेची पातळी खूप खालच्या स्तरावर पोहोचली आहे. यातून त्यांच्या भाषा आणि त्यांच्या संस्कृतीचे दर्शन राज्यातील जनतेला घडते आहे. असा टोला चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना लगावला आहे. यावेळी बोलताना आमचा एक पडळकर जर थोडा बोलला तर आम्ही लगेच त्याला आवर घातली. असे सांगत कारवाई चुकीचे असेल तर त्यांनी कोर्टात जावे. सुरुवातीच्या काळात लोक कौतुकाने बघायचे पण आता राऊतांना कुणी ऐकत नाही. असा टोला संजय राऊतांना लगावला आहे. आम्ही चळवळीतले माणसे आहोत, आम्ही शिवसेनेला घाबरणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.