आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:जयंती आगरकरांची फोटो शेअर केला टिळकांचा, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे ट्विट चांगलेच व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी पडळकर यांची जोरदार खिल्ली उडवली आहे

थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या जयंतीनिमित्त ट्विट करताना भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी चक्क लोकमान्य टिळकांचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांचे ट्विट चांगलेच व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी पडळकर यांची जोरदार खिल्ली उडवली आहे.

गोपाळ गणेश आगरकर यांची आज जयंती. या निमित्त पडळकरांनी त्यांना ट्विटरद्वारे आदरांजली वाहिली. मात्र, आगरकरांना अभिवादन करताना त्यांनी लोकमान्य टिळकांचा फोटो शेअर केला. हे ट्विट सोशल मीडियात वाऱ्यासारखे व्हायरल झालं आणि पडळकरांवर तिरकस टीका-टिप्पणी सुरू झाली. चूक लक्षात येताच त्यांनी लगेचच हे ट्विट डिलिट केलं आहे. मात्र, त्यांच्या फोटोसह असलेल्या या ट्विटचे स्क्रीन शॉर्ट अजूनही सोशल मीडियात फिरत आहेत. पंढरपूरमध्ये अलीकडे झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. पडळकरांच्या आजच्या टि्वटमुळे नेटकऱ्यांनी भाजपलाही लक्ष्य केले आहे.