आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राजकीय:वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर, काँग्रेसला रामराम करण्याच्या विचारात

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वसंतदादा पाटील यांच्या नातसून राष्ट्रवादीच्या वाटेवर

सांगली महापालिकेतील जयश्री पाटील व त्यांच्या गटाचे नगरसेवक नाराज आहेत. त्यांनी आज एका बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात चर्चा केली. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून आणि माजी मंत्री दिवंगत मदन पाटील यांच्या पत्नी आहेत. पक्ष प्रवेशाबाबत त्यांनी अजून अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. पण संभाव्य काँग्रेस फुटीची चर्चा सुरू आहे.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा एके काळी राज्याच्या राजकारणात मोठा दबदबा होता. त्यांच्या घराण्याचे काँग्रेससोबत कायम सख्य राहिले आहे. गेल्या काही दिवसात मात्र या घराण्याने काँग्रेसशी फारकत घेतली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सांगली मतदारसंघ स्वाभिमान साठी सोडला, तर विधानसभेतही उमेदवारी देण्यास टाळाटाळ झाल्याने दादा समर्थक पक्षावर नाराज होते. यातूनच वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील या काँग्रेसला रामराम करण्याच्या विचारात आहेत.