आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कुलाबास्थित महावीर ज्वेलर्समध्ये विक्रेत्याने मराठी बोलण्यास नकार दिल्यानंतर संतापलेल्या लेखिका शोभा देशपांडे यांनी शुक्रवारी थेट दुकानासमोरच फुटपाथवर धरणे धरले. सुमारे २० तासांनंतर पोलिसांनी त्यांना रुग्णालयात हलवले.
कानातले खरेदी करण्यासाठी देशपांडे गुरुवारी दुकानात गेल्या. यादरम्यान, तेथील विक्रेत्यास त्यांनी मराठीत बोलण्यास सांगितले. मात्र, विक्रेत्याने नकार तर दिलाच, उलट हाकलून दिले. यानंतर देशपांडे यांनी रात्रभर दुकानासमोरच धरणे धरून उपोषण केले. या प्रकरणानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे कार्यकर्त्यांसह महावीर ज्वेलर्स या दुकानावर दाखल झाले. त्यांनी मालक शंकरलाल जैन यांना इशारा दिला की, जोवर ते मराठी शिकत नाहीत तोवर दुकान उघडू शकणार नाहीत. जैन यांना मारहाण केल्याचाही संदीप देशपांडे यांच्यावर आरोप आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.