आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Jintendra Awhad's Criticism Of BJP For Filing Cases, Said Poor Police Officers Should Not Suffer Because Of Me; They Do As Their Superiors Tell Them

जिंतेद्र आव्हाडांचा भाजपला गुन्हे दाखल करण्यावरुन टोला:म्हणाले - गरीबांना त्रास नको; वरीष्ठ पोलिस अधिकारी सांगता तसे ते वागतात

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दोन ट्विट केले आहे. टविट करत आव्हाडांनी अप्रत्यक्ष पणे भाजपवर टीकास्त्र डागले आहे. आव्हाडांना अटक करण्यात आली, तेव्हा त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी पोलिसांविरोधातही कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता. पण आदेश कुठून आले हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे, माझ्यामुळे गरीब पोलिस अधिकाऱ्यांना त्रास होऊ नये, यासाठी काय करावे हे सूचत नाही असे जिंतेद्र आव्हाडांनी ट्विट करत भाजपला टोला लगावला आहे.

काय म्हटलंय ट्विटमध्ये?

माझ्यावर राजकीय दबावापोटी दोन खोटे गुन्हे मागील आठवड्यात 72 तासांत दाखल करण्यात आले. ह्या गुन्ह्यांविरुद्ध मी कोर्टात जाईन तेव्हा त्याचा नाहक त्रास हा पोलिस स्टेशनच्या तपासी अधिकाऱ्यांना होईल. त्या गरिबांचा काहीच दोष नाही. वरीष्ठ अधिकारी जसे निर्देश देतात तसे ते कागदपत्रे बनवतात.

म्हणजे हा गरीब बिचारा मारला जाईल आणि वरचे अधिकारी हात वर करून मोकळे होऊन जातील. ह्याच्यात काय करावे हे सुचत नाहीये. आपल्या हक्कासाठी त्या गरीबांना फासावर लटकवा, की ह्या वरच्या अधिकाऱ्यांविरुद्ध लढाई करावी अर्थात त्यांचा काय दोष आदेश कुठून आले हे महाराष्ट्रला माहीत आहे.

काय होते प्रकरण?

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आणि सुमारे शंभर कार्यकर्त्यांनी 11 नोव्हेंबरला रात्री दहा वाजताचा हर हर महादेव चित्रपटाचा शो स्वःत बंद पाडला. त्यांच्यासह अनेक कार्यकर्ते विवियन माॅलच्या चित्रपटगृहात चालून गेले व त्यांनी चित्रपट पाहू नका असे सांगत प्रेक्षकांना बाहेर काढले. यावेळी प्रेक्षकांना मारहाणही झाली होती

पोलिस सांगतात वरून दबाव

आव्हाड म्हणाले, मला अटक झाली, त्यावर कोर्टाने निकाल देताना अटकेची प्रक्रीया चुकली हे कोर्ट स्वःत म्हणत आहे. याची काॅपीही माझ्याकडे आहे. विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यापूर्वी पोलिसांनी स्वःत विचार करायला हवा. मी काय बोललो हे रेकार्डही झाले. त्या महिलेला मी एवढ्या गर्दीत कशाला जाता हे बोलले. वरुन दबाव आहे हे हवालदारापासून वरिष्ठ अधिकारी सांगतात, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जिंतेद्र आव्हाड यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...