आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकणात धुमशान:बारसू सोलगावमध्ये दडपशाही सुरू, रिफायनरीविरोधात हजारो नागरिक माळरानावर, आव्हाडांची माहिती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बारसू सोलगावमध्ये रिफायनरीविरोधात हजारो नागरिक माळरानावर उतरलेत. या ठिकाणी दडपशाही सुरू आहे. राजापूरमध्ये पत्रकारांना डांबून ठेवले आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे.

कोणालाही रिपोर्टिंग करायचे नाही, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. चौथ्यास्तंभाला अशाप्रकारे दाबले जाणे, ही स्वातंत्र्यानंतरची पहिलीच वेळ असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

काय म्हणाले आव्हाड?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात ते म्हणतात की, बारसू सोलगाव येथे जोरात आंदोलन सुरू आहे. हजारो स्त्री-पुरुष बंधू-भगिनी आंदोलनासाठी उतरले आहेत.रिफायनरी नको, ही त्यांची मुख्य मागणी आहे. अजून कुठेही संवाद साधला जात नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे राजापूरमध्ये पत्रकारांना डांबून ठेवण्यात आले आहे. या बातम्या कुठेही येऊ नयेत, असे पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत. पोलिस त्यांच्या आज्ञेचे पालन करत आहेत. सगळ्या महाराष्ट्राच्या माहितीसाठी हा व्हिडिओ काढत आहे.

निसर्ग उद्धवस्त होणार

जितेंद्र आव्हाड आपल्या व्हिडिओत पुढे म्हणतात की, महाराष्ट्राने याची नोंद घ्यावी की, कशा प्रकाराने आंदोलन दाबले जात आहे. कशा प्रकारे पत्रकारांना यापासून लांब ठेवले जात आहे. जेणेकरून महाराष्ट्राला कुठलीच माहिती मिळू नये. महाराष्ट्र बारसू सोलगाव सोबत आहे. महाराष्ट्र रिफायनरीच्या विरोधात आहे. महाराष्ट्र विकासाच्या विरोधात नाही, पण ज्यामुळे नैसर्गिक हाणी, ऱ्हास होणार आहे. तिथला निसर्ग उद्धवस्त होणार आहे. अशा सुंदर कॅलिफोर्नियामध्ये म्हणजे आमच्या कोकणात काय हवे, हे कोकणी माणसांनी ठरवायला हवे. दुसऱ्यांनी कुणीही ठरवायला नको. कोकणी कायस्थ माणसे काय म्हणतात, हे आपण समजून घेऊ.