आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''ठाण्यातील आमची लढाई आजची नाही. ही लढाई आनंद दिघेंपासून लढतोय. परंतु तेव्हा एवढे विचित्र, द्वेषाचे, खुनशी राजकारण नव्हते असे मत व्यक्त करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीकास्त्र सोडले. ठाण्यात एका कार्यक्रमात आज जितेंद्र आव्हाड बोलत होते.
तेव्हा खुनशी राजकारण नव्हते
जितेंद्र आव्हाड म्हणाले, ''ठाण्यातील आमची लढाई आजची नाही. ही लढाई आनंद दिघेंपासून लढतोय. परंतु आजच्या सारखे तेव्हा एवढे विचित्र, द्वेषाचे, खुनशी राजकारण नव्हते. त्यांचे वैयक्तिक काय ते माहीत नाही.
फायदा राष्ट्रवादीला होणार
जितेंद्र आव्हाड म्हणाले, आत्ताचे राजकारण जे राजकारण आहे ते ठाण्यात आणि महाराष्ट्रात कधीच अनुभवले नाही. येणारा काळ हा आपला आहे. लक्षात घ्या. जी मतविभागणी होणार आहे. मतविभागणीचा सर्वात जास्त फायदा राष्ट्रवादीला होणार आहे.
चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले यांनी शाळा काढल्याबाबत जे विधान केले त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, महाराष्ट्रात भाजप नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान करण्याची स्पर्धाच सुरू झालेली आहे, असेच वाटत आहे.एकापाठोपाठ एक महापुरुषांची बदनामी करणारे व्यक्तव्य येत आहेत.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, भीक हा शब्द वापरला तो योग्य आहे का? खरे तर ती सढळ हाताने मदत आहे. भीक मागून नव्हे तर रयत शिक्षण संस्था शेतकऱ्यांच्या कष्टाने उभी राहीली.
आधी ट्विट नंतर डिलीट
चंद्रकांत पाटील यांनी काल जे विधान केले होते ते निषेधार्ह होते. माझ्यासहीत अनेकांनी त्याचा निषेधही केला. पण आत्ता काही वेळापूर्वी त्यांच्यावर झालेली शाईफेक ही इथल्या लोकशाहीला शोभेशी नाही. त्या शाईफेकीचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. अशा आशयाचे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. मात्र, त्यांनी आज सकाळी हे ट्विट डिलीट केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.