आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार:जितेंद्र आव्हाडांना 'मेडीकल'साठी नेताना पोलिसांच्या जीपसमोर आले होते कार्यकर्ते

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाण्यातील विवियन माॅलच्या चित्रपटगृहातील धडगूस घालून प्रेक्षकांना मारहाण करीत 'हर हर महादेव' या चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना आज ठाणे पोलिसांनी अटक केली. त्यांची वर्तकनगर पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

पोलिसांकडून कार्यकर्त्यांवर लाठीमार

जितेंद्र आव्हाडांना सरकारी रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोलिसांच्या जीपसमोर आले होते. त्यावेळी पोलिसांनी हा लाठीचार केल्याचे सांगण्यात आले आहे. नजीब मुल्लांसह अनेक कार्यकर्त्यावर हा लाठीचार झाला.

कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

दरम्यान वर्तकनगर पोलिस ठाण्याबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी जमले असून सरकारविरोधात ते घोषणाबाजी करीत आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेचा ते निषेध करीत आहेत. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते दिसत असून ते अद्यापही नारेबाजी करीत आहेत.

काय आहे प्रकरण

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आणि सुमारे शंभर कार्यकर्त्यांनी 11 नोव्हेंबरला रात्री दहा वाजताचा हर हर महादेव चित्रपटाचा शो स्वःत बंद पाडला. त्यांच्यासह अनेक कार्यकर्ते विवियन माॅलच्या चित्रपटगृहात चालून गेले व त्यांनी चित्रपट पाहू नका असे सांगत प्रेक्षकांना बाहेर काढले. यावेळी प्रेक्षकांना मारहाणही झाली होती.

जितेंद्र आव्हाडाचे ट्विट

राज्यात ब्रिटीशराज - सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे म्हणाल्या, जितेंद्र आव्हाड यांना अटक करणे म्हणजे राज्यात ब्रिटीश आले आहे. जो चूक करतो त्याला पूर्ण माफी आणि आंदोलन करणाऱ्यांना अटक केली जात आहे. जितेंद्र आव्हाड हे लढवय्या नेते आहे. प्रश्न विचारण्यासाठी त्यांना ठाण्यात बोलाविले. नंतर असे कळले की, वरुन दबाब येत आहे तो कुणाचा हे माहित नाही. यात पोलिसांची काहीच चूक नाही. कारण त्यांना त्यांचे काम करावेच लागते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास दाखवत असेल आणि मनापासून कुणाला वेदना होत असेल तर त्यांनी आंदोलन करणे चुकीचे नाही. छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही.

अतूल भातखळकरांचे ट्विट

भाजप नेते अतूल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेनंतर एक ट्विट केले. ''जित्याची खोड, पोलिसांचे दंडूके पडल्याशिवाय जात नाही. '' अशी टीका त्यांनी केली.

अटक करणे चूक - रोहीत पवार

रोहीत पवार म्हणाले, माॅलमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी लोकांना अडचण येऊ नये म्हणून मदत करीत होते. सरकारनेच हर हर महादेव चित्रपट बंद करायला हवा होता. परंतू ते शांत आहेत. आव्हाड छत्रपतींच्या चुकीच्या इतिहासाविरोधत लढत असताना त्यांना अटक करीत असाल तर ते चुकीचे आहे. महाराजांबाबत चुकीचा इतिहास दाखवला तर आव्हाड गप्प बसणार नाही हे म्हटलेच होते. भाजप नेते नरेंद्र दाभोळकर यांच्या कर्मभूमीत जाऊन अंधश्रद्धेला चालना देणाऱ्या गोष्टी बोलतात, शिंदे गटाचे लोक गोळीबार करतात त्यांच्यावर कारवाई कधी होणार?

शो दरम्याना राडा

चित्रपटगृहात शो दरम्यान राडा झाला, त्यानंतर प्रेक्षकांशी गैरवर्तन झाले असून एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली तर काहींचे कपडे फाडण्यात आले होते. या प्रकाराने एकच गोंधळ उडाला व प्रेक्षक मात्र, आमच्या पैशांचे काय? असा सवाल करतानाही दिसले होते.

आव्हाड म्हणतात..

जितेंद्र आव्हाड म्हणाले, आमची ईच्छा आहे की, महाराष्ट्रात विकृती जाऊ नये. बाजीप्रभू शिवाजी महाराजांविरोधात लढले हे वेडात दौडले वीर मराठे सात या चित्रपटात दाखवले हे चूक आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम करण्याचे काम सुरू असून विकृत ईतिहास दाखवला जात आहे.

ऐतिहासिक संदर्भ नाहीत

आव्हाड म्हणाले, सर्वांची जबाबदारी आम्हीच घेतली असे नाही जिथे - तिथे शो बंद पाडावे. आमच्या माध्यमातून संदेश राज्यात गेला. गुळगुळीत चेहऱ्याचा मावळा कसा असेल, मला सांगा, माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. काही मुद्द्यांवर ऐतिहासिक संदर्भ चित्रपटात नाही, जे घडलेच नाही कुणी वाचलेच नाही ते चित्रपटात दाखवले गेले.

यावर आव्हाडांचा आक्षेप

  • जितेंद्र आव्हाड म्हणाले, शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मांडीवर घेऊन कोथळा काढला.
  • रघूनाथाला हनुमान तसा शिवाजीला बाजीप्रभू असे लिहीले ते तसे नाही ती वाक्यरचना वेगळी आहे.
  • मावळे दणकट असावे, देहसौंदर्य दाखवताना आपण ती भूमिका कुणाला साकारलायला देत आहोत. मेसेज काय जातोय. मावळे लुळे, पेंगळे का दाखवले गेले.
  • अक्षय कुमारला विरोध नाही, पण महाराजांच्या लढाया सोळा ते छेचाळीस या वयात झाल्या, त्या वयात अक्षयकुमार बसत नाही.कृष्णाजी भास्कर कुलकर्णींचे मुंडके उडवले हे स्पष्ट असतानाही विकृती दाखवली जात आहे.
  • शिवाजी महाराज आणि बाजीप्रभूंची लढाई दाखवली. त्यांचे नाते गेली साडेतीनशे वर्षे महाराष्ट्राला माहीत आहे मग विकृती दाखवली जात आहे.
बातम्या आणखी आहेत...