आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जितेंद्र आव्हाडावर विनयभंगाचे कलम लावा:अभिनेत्री केतकी चितळेची मागणी, वकिलामार्फत वर्तकनगर पोलिसांना पाठवली नोटीस

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

''ठाण्यातील विवियाना माॅलमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेले कृत्य सर्व पूर्व नियोजित होते. त्यामुळे कलम 120 (ब) तसेच विनयभंग (354) ही कलमे लावण्यात यावी. अन्यथा, आम्ही हायकोर्टात दाद मागू अशी भूमिका अभिनेत्री केतकी चितळे हिने घेतील. याबाबत वर्तकनगर पोलिसांना वकीलामार्फत आज नोटीस पाठवली आहे.

विवियाना माॅलमधील चित्रपटगृहात 'हर हर महादेव' चित्रपटादरम्यान झालेल्या राड्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली. यानंतर केतकी चितळे आक्रमक झाल्या आहेत.

सर्व प्रीप्लाॅंट

केतकी चितळे म्हणाली, ''मी माझ्या वकीलामार्फत वर्तकनगर पोलिस ठाण्यात नोटीस पाठवली. यात मी नमूद केले की, ठाणे चित्रपटगृहात जे घडले ते प्री- प्लॅंट वाटत होते. जर कुणाला निषेध करायचा असेल तर ती व्यक्ती सोशल मीडीया प्लॅटफार्मवर बोलली असती. त्या व्यक्तीने पत्रकार परिषद घेतली असती परंतु असे घडले नाही.''

धूडघूस घालणे योग्य नाही

केतकी चितळे म्हणाली, ''चित्रपटगृहात आपण मीडलक्लास लोक ज्यात लहान मुलांपासून वृद्धापर्यंत जातो, अशा ठिकाणी जाऊन मारहाण करणे आणि धुडगूस घालणे योग्य आहे का?''

चेंगराचेंगरी झाली असती तर..

केतकी चितळे म्हणाली, ''जर चित्रपटगृहात चेंगराचेंगरी झाली असती तर किती हानी झाली असती याचा विचार करायला हवा. आव्हाड यांच्यासोबतचे कार्यकर्ते पसार झाले आहेत. त्यामुळे हा मुद्दा लक्षात ठेवायला हवा की, ठाण्यात जे घडले ते इतरत्रही घडू शकते. आव्हाडांची एकूण हिस्ट्री पाहता न्यायालयाने जास्तीत जास्त कोठडी द्यावी. त्यांची बेल रिजेक्ट करण्यात यावी.''

काय आहे नोटीसमध्ये?

  • जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचे कलम लावण्यात यावे. ज्या व्यक्तीला मारहाण झाली त्यावेळी त्या व्यक्तीची पत्नीही तिथे होती. त्यांनाही मारहाण झाली.
  • कलम 120 (ब) लावण्यात यावे, कारण माॅलमधील धूडगूस हा प्लॅनिंगचा भाग होता. ते सर्व प्री प्लॅन होते.
  • हे जर केले नाही, तर आम्ही हायकोर्टात दाद मागू , वर्तक नगर आणि ठाणे पोलिसांना या नोटीसची काॅपी केतकी चितळेंच्या वकीलांनी पाठवली आहे.

मला आनंद - आव्हाड

जितेंद्र आव्हाड यांना अटक झाल्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी त्यांना पोलिसांनी सरकारी रुग्णालयात नेते. यावेळी माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला असता, '' शिवाजी महाराजांच्या इतिहासातील विकृतीकरणाबाबत बोलल्यामुळे मला अटक झाली, याचा आपल्याला आनंद आहे.'' अशी प्रतिक्रीया दिली.

बातम्या आणखी आहेत...