आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजीनामा:जितेंद्र आव्हाडांचा 'राष्ट्रवादी'च्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा; शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा अशी मागणी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी करत बुधवारी जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. लोकशाहीत त्यांना लोकांचे ऐकावेच लागेल. लोकांच्या बाजूने निर्णय घ्यावा लागेल, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त होते. मात्र, प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी आपण राजीनामा दिला नसल्याचे सांगितले. सध्याही राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण होणार यासाठी बैठकावर बैठका सुरू आहेत.

राजीनामा सत्र सुरू

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. आव्हाडांसोबत ठाण्यातील राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवले. सगळे कार्यकर्ते आपापले राजीनामे जयंत पाटील यांना पाठवत आहेत. मी राष्ट्रीय सरचिटणीस आहे. मी सुद्धा राजीनामा पाठवला असल्याचे आव्हाडांनी सांगितले.

लोकांच्या कलाने घ्या

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शरद पवारांना निर्णय मागे घ्यावा लागेल. ते नेहमी म्हणायचे की, लोकशाहीत लोकांचे ऐकावे लागते. लोकांच्या कलासोबत नेत्यांनी चालले पाहिजे. नेते भले नाराज झाले, तरी चालतील. मात्र, लोक ज्या बाजूने आहेत, त्यांनी त्याच बाजूने त्यांनी चालले पाहिजे. शरद पवार असे कसे करू शकतात, त्यांनी आम्हाला विश्वासात का घेतले नाही, असा सवाल त्यांनी केला.

नव्या लोकांना घ्यावे

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शरद पवारांसाठी आमचे आयुष्य काहीच नाही का? ही लढाई आम्ही शरद पवारांशिवाय कशी काय लढणार? मी आतापर्यंत जी-जी भूमिका घेतली, ती लोकांनी आणि नंतर पक्षाने घेतली. शरद पवार नेहमी नव्या लोकांना संधी देतात. आता आम्हीही राजीनामा दिला आहे. नव्या लोकांना घ्यावे, अशी उद्विग्न प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

संबंधित वृत्तः

भाकरी फिरवणार:राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून शरद पवार निवृत्त; स्वत: केली घोषणा, यापुढे निवडणूकही लढवणार नाही

82 वर्षांच्या शरद पवारांनी NCP चे अध्यक्षपद सोडले, कार्यकर्ते नाराज; अजितदादा म्हणाले - फेरविचारासाठी साहेबांनी मागितला वेळ

लोक माझे सांगाती:अजितचा पहाटेचा शपथविधी माझ्या सहमतीविना; शरद पवारांनी पुस्तकातून सोडले मौन