आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकशाहीमध्ये लोकांचे मन जिंकायचे असते, धडपशाही नसते, खारघरच्या सभेत काय झाले? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
खारघरमध्ये ज्यांचा जीव गेला त्यांच्या घरी कोणी मंत्री गेले नाहीत, केवळ स्वत:च्या मागे किती जनता आहे हे दाखविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आम्ही प्रकल्पाच्या विरोधात नाही. मात्र, कोकणाचा स्वास्थ्य बिघडत असेल, स्थानिकांच्या विरोध असेल तर आम्ही त्यांच्यासोबत असणार असेही आव्हाडांनी स्पष्ट केले. एका मुलाने रॅप केला, त्याला अटक केले,पच्चास खोका स्वतः वर तुम्ही काय घेता? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र राहिले तर कोणाचा बापही आम्हाला हरवू शकत नाहीख् असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मविआला जनतेचा कौल
मुंबई खरी वाढवली कुणी तर ती इथल्या कामगारांनी, शोषण सहन करुनही त्यांनी हे सगळे उभे केले आहे. मुंबईसाठी 105 हुतात्माच्या बलिदानामुळे महाराष्ट्राला मिळाली आहे. केंद्र सरकार मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेनेच्या लोकांना त्रास देऊन त्यांना स्वत:कडे वळविण्यात आले. अंबरनाथ, बदलापूर, ठाणे सगळीकडे दडपशाही आणि दहशत यातून लोकांना आवडत नाही. बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व जनमतेचा कौल कळून आला. मविआला जनतेनी मोठा कौल दिला आहे.
खारघरच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी
आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली, लोक त्यांच्यासाठी आले होते, सरकारसाठी नाही. सिडको च्या वेळेस शरद पवार आणि दिबा पाटील यांनी लोकांशी चर्चा केली होती. फक्त नाटेगावात जर 1 लाख लोकांना रोजगार मिळणार असेल तर विकरास आम्हाला नको असे आमचे म्हणणे नाही. स्थानिकांना जाऊन लोकांना बोलायला हवे. आंदोलन चिरडले जात नसते, त्यांच्याशी चर्चा करणे गरजेचे आहे.
रिफायनरी विरोधात नाही पण..
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पर्यावरणाचा ऱ्हास होऊन रिफायनरी नको, रिफायनरीमुळे मुंबई ते वेंगुर्लापर्यंत मासेमारी बंद होणार आहे. साध्या प्लेन जागेवर रिफायनरी करायला काही हरकत नाही. प्रकल्प राज्याच्या बाहेर जाऊ नये. पण कोकणात प्रकल्प करण्याचा गरज नाही.
रॅपरला अटक
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अरे 50 खोका तुमने खाया, लोकांनी काय पाया, म्हणत रॅपसॉन्ग लिहणाऱ्या पोरांना तुम्ही जेलमध्ये टाकले असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. माझा डीएनए विचारणाऱ्यांना मी सांगतो की हिंदू आहे. आम्ही देशातील संविधान बाजूला होऊ देणार नाही, कारण त्यामुळे देशातील लोकशाही संपुष्ठात येईल असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.