आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला टोला:'कर्नाटकच्या निकालाने दाखवून दिले बजरंगबली कोणासोबत', जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक विधानसभा निवडणूकीची मतमोजणी सुरू असून निकाल हाती येत असताना यावर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे.

आज खुद्द बजरंगबली देखील कोणासोबत आहे, हे कर्नाटक निवडणूकीने दाखवून दिले आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

नक्की काय म्हणाले आव्हाड?

कर्नाटकात मतमोजणीचे कल काँग्रेसच्या बाजूने लागत असताना भारतीय जनता पक्ष विरोधकांच्या निशाण्यावर आला आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'कर्नाटक निवडणुकीचे निकाल यायला सुरुवात झालीय. काँग्रेस स्पष्ट बहुमताने सरकार बनवत असल्याचं स्पष्ट होत आहे. या निवडणुकीत भाजपने बजरंग बली अर्थात हनुमानाला निवडणुकीचा मुद्दा बनवला होता. परंतु खुद्द प्रभू हनुमानाला देखील ही गोष्ट आवडलेली दिसत नाहीये." असेही आव्हाड म्हणाले.

हनुमान सज्जनांच्या सोबत

आव्हाड म्हणाले, हनुमान चालिसा मध्ये एक कडव आहे. "महाबीर बिक्रम बजरंगी। कुमति निवार सुमति के संगी..!" अर्थात- महावीर बजरंग बली हे पराक्रमी आहेत. ते दुर्जनांच निराकरण करतात तर सज्जनांच्या सोबत उभे राहतात. थोडक्यात आज खुद्द बजरंग बलीने देखील ते नेमके कोणासोबत आहेत हे कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने अवघ्या देशाला दाखवून दिले आहे.