आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज ठाकरेंनी काल त्यांच्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसमुळे राज्यात जातीय वाद वाढलाय असे वक्तव्य केले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत राज ठाकरेंवर टीका केली आहे. लोकांना आवडत नसेल तर काही जण एका चेहऱ्यावर अनेक मुखवटे चढवतात अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
दरम्यान राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तक वाचली असती तर त्यांना जात पात समजेल आणि त्याचे जन्मदाते ही समजतील. शरद पवार साहेबांचे नाव घेतले कि महाराष्ट्रात चर्चा होतेच, हे गणित डोक्यात ठेऊन काही जण भाषण करतात अशी जहरी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची 1999 ला स्थापना झाली, आणि तेव्हा पासून राज्यात जाती पातीचे राजकारण सुरू झाले. शरद पवार या जातीय राजकारणासाठी कारणीभूत आहेत असा आरोप राज ठाकरेंनी केला होता. तसेच त्यांनी आम्ही जातीपातून बाहेर पडत नाहीत, मग हिंदू कधी होणार पुढे असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी तो त्या जातीचा हा या जातीचा असे म्हणत फूट पाडत पाडत कधी मराठा आरक्षणाचे आमिष दाखवायचे, असे म्हणत राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. तर बाबासाहेब पुरंदरे हे यांचे सॉफ्ट टार्गेट आहे. आम्हाला इतिहास वाचायचा नाही. लिहिला कोणी, पुरंदरे, ब्राह्मण, अच्छा म्हणजे यांनी चुकीचा लिहिला असणार, अशी टीका राज ठाकरेंनी यावेळी केली.
जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर
राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तक वाचली असती तर त्यांना जात पात समजेल आणि त्याचे जन्मदाते ही समजतील. असे प्रत्युत्तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना दिले आहे.
मनसेचा झेंडा पोस्ट करत आव्हाडांचा सवाल
जितेंद्र आव्हाड यांनी अजून एक ट्विट करत राज ठाकरेंना प्रश्न विचारला आहे. तुम्ही जातीपातीचे राजकारण कधी संपवणार असा सवाल मनसेचा झेंडा पोस्ट करत केला आहे. या ट्विटमध्ये झेंडा पाहून घ्या एकदा..विषय संपला..नीळा..भगवा..हिरवा असे म्हणत राज ठाकरेंचा समाचार घेतला आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांचे नाव घेण्याचे टाळले
यानंतर दुसरे ट्विट करत आव्हाडांनी शिवरायांच्या महाराष्टात गाडलेल्या जेम्स लेनला परत वरती काढायची गरज नव्हती, जेम्स लेनचे जन्मदाते हे कोण होते, हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. जे गेले त्यांच्या बद्दल बोलणे आमच्या संस्कृतीत नाही. असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचा नामउल्लेख टाळत, राज ठाकरेंवर निशाणा साधलाय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.