आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती संभाजीराजे स्वराज्यरक्षक अन् 'धर्मवीर':जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य; म्हणाले - औरंगजेबासमोर महाराज झुकले नाहीत

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीराजे स्वराज्यरक्षक अन् 'धर्मवीर' होतेच, पण एका धर्मासाठी नाही तर स्वराज्यामध्ये धर्म असतो आणि त्या धर्माचे रक्षण करण्यासाठी शिवाजी महाराज आणि शंभुराजे यांनी केला, असे म्हणतानाच मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच स्वराज्यरक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला कुणी दिली? इथेच तर खरा इतिहास आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, औरंगजेब हा क्रूर होता. त्याने वडिलांना मारले. काकांना मारले, पण शिवाजी महाराज आणि शंभूराजे औरंगजेबासमोर महाराज झुकले नाहीत. शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले ते संभाजीराजे यांनी जपले म्हणून ते स्वराज्य रक्षक होते. पण एका धर्माशी नाव जोडून त्यांना एका धर्मांशी बांधण्याचे काम करू नये असे म्हटले आहे. तर मग संभाजीराजेंवर सावरकर आणि गोळवळकर यांनी टीका का केली असती.

औरंगजेब क्रूर होताच

जितेंद्र आव्हाड म्हणाले की,औरंगजेब क्रूर होता. त्याने संभाजीराजेंना हलाल करून मारले, पण श्ंभूराजेंनी कुणा धर्माचा प्रचार केला किंवा त्यासाठी मृत्यू पत्करला हे मला मान्य नाही. जर शंभूराजे इतके महान होते, तर सावरकर आणि गोळवळकर यांनी त्यांच्याबद्ल असे का लिहिले याचे उत्तर त्यांना खांद्यावर घेऊन बोलणाऱ्यांनी मला द्यावे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, संभाजीमहाराज हे स्वराज्य रक्षक होते. स्वराज्यात धर्म येतो. त्यामुळे ते धर्मवीर होते. ज्या उमेदीने औरंगजेब महाराष्ट्रात आला होता, ते मराठा साम्राज्याने थांबवले. एका कुठल्या धर्मासाठी शंभूराजे धर्मवीर नव्हते, असे म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही अजित पवार यांच्या व्यक्तव्याला जोडून एक वक्तव्य केल्याने त्यानंतर पुन्हा वादाला तोंड फुटले आहे.

बातम्या आणखी आहेत...