आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंचे वादग्रस्त वक्तव्य:मदरशात एक वस्तरा सापडला तर राजकारण सोडून देईल; जितेंद्र आव्हाडांचे राज ठाकरेंना खुले आव्हान

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी शिवतिर्थावर आयोजित मनसेच्या गुडी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी वादग्रस्त विधान केले. मदरशात एक धाड टाका असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. त्यावर आता महाविकास आघाडीतील नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना आव्हान दिले आहे. मदरशात एक वस्तरा सापडला तर राजकारण सोडून देईल, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. राज ठाकरेंकडून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज ठाकरे यांनी आग लावण्याचे काम करू नये, त्यांचा उद्देश स्पष्ट दिसत आहे. असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

पुढे आव्हाड म्हणाले की, दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम राज ठाकरे करत आहेत. कालपर्यंत महाराष्ट्राचा विकासाची, रोजगाराची भाषा करणारे राज ठाकरे यांनी कालपासून तरूणांना रोजगार देण्याचे काम सुरू केले आहे. तरूणांनी मशिदी समोर जायचे. यामुळे दोन्हीकडून आग लागेल. राज ठाकरे राजतीर्थावर घरी निवांत बसून मजा पाहतील. आंदोलन करणारे तुरुंगात जातील, सोडायला कोणीही येत नाही. मग आई वडिलांना धावपळ करावी लागते. हे जुने गणित आहे. असे आव्हाड म्हणाले.

राज ठाकरे यांना कालच्या गुडी पाडवा मेळाव्यात अचानक बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा पुळका आला. कधी आयुष्यात त्यांनी जय भीम म्हटले का? कधी घरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या चैत्यभूमीवर गेलेत का? असा सवाल देखील आव्हाडांनी राज ठाकरे यांना विचारला आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

मुंबईतील मशिदी आणि मदरशांमध्ये देशविरोधी कृत्ये सुरू आहेत. असे राज ठाकरे यांनी कालच्या भाषणात सांगितले होते. पुढे ते म्हणाले होते की, घातपाती कारवायांची भयानक कटकारस्थाने कशी सुरू आहेत, याची माहिती तुम्हाला पोलिस देतील. आपल्याला घातपाती कारवायांसाठी पाकिस्तानची गरजच नाही. या मशिदी आणि मदरशांमध्येच घातपाती कारवाया करणारे दडले आहेत. याविषयी माहिती मिळाली तर तुम्हाला धडकी भरेल, असे राज ठाकरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...