आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आव्हाडांचे बावनकुळेंना प्रत्युत्तर:बावन कुळे सोडा, लाख कुळे आली तरी पवारांच्या पायाच्या नखावरची धूळसुद्धा उडणार नाही

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बावन कुळे सोडा, लाख कुळे आली तरी शरद पवारांच्या पायाच्या नखावरची धूळसुद्धा उडणार नाही. उद्गारली अनेक कुळे केवळ साहेबांमुळे, या शब्दात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लोकसभेसाठीच्या 'मिशन बारामती' दौऱ्यावर असलेल्या भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रत्युत्तर दिले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीत येऊन शरद पवारांना चॅलेंज दिले. राजकारणात गड वगैरे कुणाचा नसतो. अनेक गड उद्ध्वस्त झाले आहेत. कुणाचा गड किंवा वर्चस्व कधीच कायम राहत नाही. वेळेनुसार ते बदलत असते ते म्हणाले होते. यावर आज ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार केला.

आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले की, आजही काहीजण परत एकदा शरद पवार साहेब आणि बारामती यांच्याबद्दल बोलतायेत. गड उध्वस्त करू म्हणून वल्गना करताहेत विसर्जन करू म्हणता आहेत अर्थात ते केवळ आपण आणि आपला पक्ष चर्चेत रहावा म्हणून…बारामतीचा गड जिंकून दे असे साकडे बारामतीच्या मारूतीच्या देवळात जाऊन आज कुणीतरी घातले. 60 वर्षे प्रत्येक निवडणूकीचा फॉर्म आदरणीय शरद पवार साहेब ह्याच मारूतीच्या समोर उभे राहून नंतर दाखल करतात. आज तो मारुती देवळाच्या बाहेर येऊन हसत हसत विचारत होता. हे आत्ता आलेले ते कोण होते ? या शब्दात खिल्ली उडवली.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 1990 नंतर शरद पवार साहेबांचे नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही असे विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना उबगले. त्यानंतर सातत्याने खोटेनाटे आरोप जे कधी सत्यात उतरले नाहीत; ते बेलगाम आणि बेफामपणे करण्यात आले. त्याचा महाराष्ट्राच्या जनतेवर कुठलाच परिणाम झाला नाही.

भाजपचे मिशन बारामती
भाजपच्या 'मिशन बारामती'ला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. भाजपने लोकसभा निवडणूक 2024 साठी 'मिशन 45' आखले आहे. पवारांना धक्का देण्यासाठी भाजपने आता बारामतीवर लक्ष केंद्रीत केल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या 22 ते 24 सप्टेंबरदरम्यान देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देखील बारामती दौऱ्यावर येत आहे. पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बावनकुळे बारामतीच्या दौऱ्यावर आले होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवार कुटुंबियांच्या प्रचाराचा नारळ ज्या कन्हेरीच्या हनुमान मंदिरात फुटतो, त्याच मंदिरात जाऊन चंद्रशेखर बावनकुळे यांनी बजरंगबलीचा आशीर्वाद घेत काटेवाडी (बारामती) येथे बूथ क्रमांक 218 समितीचा आढावा घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...