आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास दाखवल्यावरुन हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध दर्शविला. आता वेडात दौडले वीर मराठे सात या चित्रपटातील भूमिकेवरच त्यांनी आता आक्षेप घेत ट्विटद्वारे हल्ला चढवला आहे. या चित्रपटात शिवरायांची भूमिका सिने अभिनेता अक्षयकुमार याने केली आहे.
जितेंद्र आव्हाडांचे ट्विट
''जर्मनी,पॅरिस, अमेरिका येथे संग्रहालयात असलेली ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकालीन चित्र आहेत. त्यावरुन शिवाजी महाराजांची साधारणत: आपल्याला कल्पना येते. चित्रपट येतोय. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’. त्यामधील शिवाजी महाराज बघितल्यावर महाराष्ट्राला "वेड्यात" काढले जातये असे वाटते.
आव्हाडांचा आक्षेप
आव्हाड म्हणाले, शिवाजी महाराजांची उंची आणि अक्षयकुमारची उंची यात मोठा फरक आहे. त्याकाळी प्रत्यक्षात शिवरायांचे वय आणि भूमिकेतील व्यक्तिरेखेतील अक्षयकुमार याच्या वयाचा ताळमेळ नाही. शिवाजी महाराज दिसायला कसे होते आणि अक्षयकुमार पहा कसा दिसतो?
देहयष्टी, भूमिकेवर बोट
माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी सुबोध भावेच्या ‘हर हर महादेव’ आणि महेश मांजरेकरांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडला सात’ या मराठी चित्रपटांना विरोध दर्शवला. याचदरम्यान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हेदेखील आक्रमक झाले आहेत. हर हर महादेव चित्रपटांतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचा चुकीचा इतिहासाची दाखवला जात असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी शिवराय आणि अक्षयकुमार यांची देहयष्टी यासह भूमिकेवरही बोट ठेवले आहे.
आता पुढे काय?
जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्ह्यातील विवियाना मॉलमध्ये 'हर हर महादेव' या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या 100 कार्यकर्त्यांविरोधात ठाण्यातील वर्तक नगर पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला अटक व नंतर जामीन ही प्रक्रीया पारही पडली परंतु आता 'वेडात दौडले वीर मराठे सात' या चित्रपटाबाबत आव्हाड यांनी आपला रोख आणि रोष व्यक्त केलाच परंतु पुढे ते काय करतात, त्यांची भूमिका काय असेल हे आगामी काळात कळेलच.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.