आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका बाईला हाताने बाजूला केले तर तिने माझ्यावर विनयभंगाचाच गुन्हा दाखल केला. आता गर्दीत बाई दिसली की मी चार फूट लांब पळतो. मी आता शपथच खाल्ली आहे की बायकोला सोडून कुणालाही स्पर्श करायचा नाही, असे विधान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
नवी मुंबईत आगरी कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जितेंद्र आव्हाड बोलत होते. पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, पूर्वी कुणाच्या अंगावर जायची भीती वाटायची नाही. आजकाल अंगावर जायलाही भीती वाटते. कारण कधी रात्री उचलून नेतील सांगता येत नाही. गुन्हा काय? तोही सांगता येत नाही. माझ्यावर 72 तासात दोन गुन्हे दाखल झाले. कधी काय होईल सांगता येत नाही.
सरकार म्हणजे कहरच
पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले, सरकार म्हणजे कहर आहे. 1932 चा कायदा काढून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तो ठाण्यात लागूच होत नाही. बेल देताना जजने सांगितले हे गुन्हेच होत नाही. तर लावलेच कसे? पण राज्यात हमारी मर्जी असे सुरू आहे, अशी टीका आव्हाड यांनी केली.
मी कुठे सीएमला टार्गेट केलं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपल्या नात्याविषयी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, मैत्री कधी तुटते का? दोस्त दोस्त ना राहा, प्यार प्यार ना राहा, असं कधी होतं का? मी कुठे सीएमला टार्गेट केलं? तुम्हाला वाटतं निशाणा आहे. मी कुणावर निशाणा वगैरे ठेवत नाही. बीजेपी काय म्हणते यावर जितेंद्र आव्हाड चालत नाही असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
या प्रश्नांची उत्तरे द्या
संभाजी महाराजांच्या उपाधीविषयी सुरु अससेल्या वादावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, संभाजी महाराजांवर विषप्रयोग कोणी केला? संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली कुणाला दिले? ते नेमके सनातनी मनुवादी कोण आहेत? या प्रश्नांची उत्तरे द्या. असे आव्हान आव्हा़डांनी भाजपला दिले.
एकनाथ शिंदे हे व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र आहेत. व्हाईसरॉयच्या हातात कायदा होता, तो कोणाचंही ऐकायचा नाही तसे हे व्हॉईसरॉय असल्याची टीका यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केली,
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.