आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भांडुपमध्ये वादग्रस्त बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनरवर जितेंद्र आव्हाड यांची अफझल खानाशी तुलना करण्यात आली आहे.
नेमके कुठे लागल बॅनर?
भांडूप पूर्व द्रुतगती मार्गावर ठाण्याच्या दिशेने जाताना लावण्यात आलेल्या बॅनरवर जितेंद्र आव्हाड यांना डिवचणार मजकूर दिसून येत आहे. हे बॅनर्स नेमके कुणी लावनले याबाबत काही माहिती समोर आली नसली तरी रात्री अंधाराचा फायदा घेत हे बॅनरर्स लावण्यात आले आहेत. मात्र, या बॅनर्सची आता राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे.
बॅनरवर मजकूर काय?
जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात लागलेल्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज हे अफझल खानाचा कोथळा बाहेर काढतानाचे छायाचित्र असून बाजूलाच जितेंद्र आव्हाड हे अफजल खानांसारखे दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
मनपाने काढले बॅनर
जितेंद्र आव्हाडबद्दल आक्षेपार्ह बॅनर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढून टाकले आहेत. कोणताही वाद होऊ नये, आणि सामाजिक एकोपा जपला जावा या उद्देशाने मनपाने ही कारवाई केली आहे. हे बॅनर अनधिकृतपणे लावण्यात आल्याची माहिती देखील मनपा प्रशासनाने दिली आहे.
जितेंद्र आव्हाडांचे वक्तव्य काय?
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच स्वराज्यरक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला कुणी दिली? इथेच तर खरा इतिहास आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, औरंगजेब हा क्रूर होता. त्याने वडिलांना मारले. काकांना मारले, पण शिवाजी महाराज आणि शंभूराजे औरंगजेबासमोर महाराज झुकले नाहीत. शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले ते संभाजीराजे यांनी जपले म्हणून ते स्वराज्य रक्षक होते. पण एका धर्माशी नाव जोडून त्यांना एका धर्मांशी बांधण्याचे काम करू नये असे म्हटले आहे. तर मग संभाजीराजेंवर सावरकर आणि गोळवळकर यांनी टीका का केली असती.
हे ही वाचा
मी बायको सोडून कुणालाच स्पर्श करणार नाही:जितेंद्र आव्हाडांनी घेतली शपथ; म्हणाले -CM एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे व्हाईसरॉय
एका बाईला हाताने बाजूला केले तर तिने माझ्यावर विनयभंगाचाच गुन्हा दाखल केला. आता गर्दीत बाई दिसली की मी चार फूट लांब पळतो. मी आता शपथच खाल्ली आहे की बायकोला सोडून कुणालाही स्पर्श करायचा नाही, असे विधान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. वाचा सविस्तर
छत्रपती संभाजीराजे स्वराज्यरक्षक अन् 'धर्मवीर':जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य; म्हणाले - औरंगजेबासमोर महाराज झुकले नाहीत
छत्रपती संभाजीराजे स्वराज्यरक्षक अन् 'धर्मवीर' होतेच, पण एका धर्मासाठी नाही तर स्वराज्यामध्ये धर्म असतो आणि त्या धर्माचे रक्षण करण्यासाठी शिवाजी महाराज आणि शंभुराजे यांनी केला, असे म्हणतानाच मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.