आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत आज मुंबईत भाजपने जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन केले. मात्र, आपण आपल्या वक्तव्यावर ठाम आहोत, असे प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी जे बोललो, त्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण केले आहे. बहुजनांना बदनाम करण्याची भाजपची ही जुनीच पद्धत आहे. मी जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडले आहे. तुम्ही बहुजन महापुरुषांची बदनामी करा, आम्ही उत्तर देऊ. बहूजन इतिहास का डोळ्यात सलतो.
तसेच, करारा जबाब मिलेगा, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार केला आहे.
नेमके वादग्रस्त वक्तव्य काय?
एका जाहीर कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, एमपीएससीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास काढण्यात आला आहे. शिवइतिहासातून औरंगजेब, अफझलखान, शाहिस्तेखान यांनाच काढून टाकले, तर शिवरायांचा इतिहास काय सांगणार?
विरोधकांनाच दिले आव्हान
जितेंद्र आव्हाड यांच्या याच वक्तव्यावरुन भाजपने त्यांना लक्ष्य केले. यावर 'रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा', असे उलट आव्हान जितेंद्र आव्हाडांनी दिले आहे. तसेच, शिवाजी महाराजांबाबत आपण केलेल्या वक्तव्यात वादग्रस्त काय आहे, हे विरोधकांनी समजावून सांगावे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
भाजपचे मानले आभार
भाजपवर टीकास्त्र सोडताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, महाराष्ट्र भाजपचे मनापासून आभार मानतो. तुम्हांला (भाजप) धन्यवाद देतो. आमच्या यात्रेला प्रसिद्धी तुम्ही एका तासांतच मिळवून दिलीत. 'आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा' ह्या पहिल्याच परिषदेवर तुम्ही इतकी टिका केलीत, त्यामुळे ही यात्रा प्रत्येक घराघरात आता चर्चेचा विषय झाली आहे. बहुजनांचा इतिहास तुम्हाला का खुपतो? हेच आम्हाला समजत नाही. आमच्या परिषदेला तुम्ही घरोघरी पोहचवलात याबद्दल मी परत एकदा आपले मनापासून आभार व्यक्त करतो.
या वक्तव्यासोबत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावर माफी मागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
संबंधीत वृत्त
जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर मुंबईत राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने, जोरदार घोषणाबाजी
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सोमवारी सकाळी दक्षिण मुंबई परिसरात भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मुंबई पोलिसांनी या आंदोलनाचे राजकीय संघर्षात रूपांतर होण्यापूर्वी नियंत्रणात आणले. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.