आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रॅप गायक राज मुंगासेनंतर आता उमेश खाडेला त्याच्या आई-वडिलांना वडाळा पोलिसांनी ठाण्यात डांबले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी दिली. 'भोंगळी केली जनता' या गाण्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
‘चोर आले, पन्नास खोके घेऊन चोर आले’, या रॅप साँगमुळे राज मुंगासे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका कलाकाराला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. व्यथा व्यक्त करणे हा जर गुन्हा असेल तर किती जणांना तुम्ही अटक करणार आहात, असा सवाल आव्हाड यांनी केला आहे.
तुकाराम असते तर...
आज तुकाराम महाराज असते, तर तेही कदाचित जेलमध्ये असते, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. आता व्यथा व्यक्त करणे हा जर गुन्हा असेल, तर मग कामावर जाणारे आणि ट्रेनमध्ये आपल्या व्यथा मांडणाऱ्या प्रत्येकालाच अटक करा, अशी मागणीही त्यांनी केली.
जितेंद्र आव्हाडांचे टविट काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टविटमध्ये म्हटले आहे की, “भोंगळी” हे रॅप गाणे तयार करणारा तरुण कलाकार उमेश खाडे आणि त्याच्या आई-वडिलांना वडाळा पोलिस स्टेशनमध्ये डांबून ठेवले आहे. या गाण्यामध्ये आक्षेपार्ह असे काहीच नाही. त्याने कोणाचेही नाव घेतलेले नाही. आपल्या गरीबीवर तो या गाण्यामध्ये व्यथीत होऊन बोलला आहे.
प्रत्येकालाच अटक करा
आव्हाड पुढे म्हणतात की, आता व्यथा व्यक्त करणे हा जर गुन्हा असेल, तर मग कामावर जाणारे आणि ट्रेनमध्ये आपल्या व्यथा मांडणाऱ्या प्रत्येकालाच अटक करा. असे किती जणांना तुम्ही अटक करणार आहात. तुम्ही लोकांच्या भावना अशाप्रकारे दाबू शकत नाही. हे पोलिसी राज नाही. लोकशाहीमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही असे आपल्याला चिरडू देणार नाही.
खाडेला लगेच सोडा
आव्हाड पुढे म्हणतात की, उमेश खाडेला लगेच सोडा. पोर-पोरींनो व्यक्त व्हा… फासा लटकवणार का… मी कायम तुमच्या बरोबर आहे .. आपला गळा दाबत आहे तुकाराम जेल मध्येच बसले असते ह्यानी तर नामदेव ढसाळ ह्यांना आयुष्य भर जेलमध्ये बसवले असते, विद्रोह हा महाराष्ट्राच्या अणुरेणूत आहे.
गाण्याचे नेमके बोल काय?
उमेश खाडेने जे गाणे गायिले आहे, त्याचे बोल असे आहेत...भोंगळी केली जनता सतराशे साठ पक्ष जनतेवर नाय लक्ष, गरिबांची लुटमार विकासाची नाही... भर, आंधळ्याचे सोंग आम्ही कुठवर आणणार भोंगळी केली जनता भोंगळी केली भो ..भो..भो विरोधक शासक दोस्त है सारे केवळ मस्त चाललंय, उरावर बसून उडताय तुम्ही, ..मारा आमची आता एवढंच बाकीये, कामधंदा नाही तरुण घ्यायलागला फाशी, आठ घर सोडता दोन घर उपाशी हे कुठंवर चालणार कुठंवर कुठंवर पोराबाळ शिकायला तुमचे परदेशी, सोनं गहान ठेवून लढतो अॅडमिशनसाठी चांगले दिस आले तरी शेतकरी उपाशी, हक्काचा बातावर ..वर लाता भ्रष्टाचारी यांचे काका नी मामा खांदानी धंदा नी घर भरली यांची आश्वासन लय मोठा दिला काय नाय झा... ओ साहेब ओ साहेब महागाई ..व्हते हो साहेब.. गरिबीतून वर तोंड काढता येईना ओ साहेब.. असे बोल या गाण्याचे बोल आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.