आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''लोक कामाला लागले, खिशात पैसे नाही. गॅस, केरोसीन, पेट्रोल महागले, यावर कुणीही बोलत नाही. जनतेचे मन वळवून भलत्याच विषयावर बोलले जाते. महागाई गरीबांना खाते याबद्दल बोला असा सल्ला जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांनी दिला.
राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर गुडीपाडव्याच्या दिवशी मेळावा घेत घणाघाती भाषण केले होते. त्यावेळी त्यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याची भाषा केली जर ते उतरवले नाही तर हनुमान चालिसा लावू असे वक्तव्य केले होते. याशिवाय त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. यानंतर त्यांच्यावर टीकाही झाली.
आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते व महाविकास आघाडीतील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्या भाषणातील वक्तव्यावर सल्ला दिला.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
सर्व समाज एकत्र वावरताना दिसत आहे. महाराष्ट्र शांतच, कुठेही क्लेश, द्वेष नाही. कोरोनाचा संकट काळ होता त्यानंतर आता लोक कामाला लागली आहेत. लोकांच्या खिशात पैसा नाही. गॅस महागला. पेट्रोल – डिझेल, भाज्यासह खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून सर्वच गोष्टी महाग झाल्या. याबाबत काही बोलत नाहीत. मात्र जे गरजेचे नाही त्याला मुद्दा बनवला जात असून मुख्य विषयापासून लोकांना इतरत्र नेण्याचे काम सुरू आहे असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
राज ठाकरेंचे ते वक्तव्य
'' मुस्लीम समाजाने प्रार्थना करायची असेल तर ती घरी करावी. माझा प्रार्थनेला विरोध नाही पण मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागेल. जिथे भोंगे लागतील तिथे आम्हाला लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा लावावा लागेल.'' असा इशाराही राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर दिला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.