आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसला धक्का:राहुल गांधींचे निकटवर्तीय जितिन भाजपमध्ये सामिल, म्हणाले - 'केवळ भाजपच देशहितासाठी काम करणारा पक्ष'

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माझ्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू होत आहे

कॉंग्रेसला मोठा झटका बसला आहे. कॉंग्रेसचे दिग्गज आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले जितिन प्रसाद भाजपमध्ये दाखल झाले. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी त्यांना दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाचे सदस्यत्व मिळवून दिले. तत्पूर्वी, जितिन प्रसाद यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानीही भेट घेतली. पक्षाचे सदस्यत्व घेतल्यानंतर जितिन यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आता फक्त भाजप हा पक्ष देशहितासाठी काम करत आहे. उर्वरित पक्ष वैयक्तिक आणि प्रदेश-विशिष्ट झाले आहेत. राष्ट्रीय पक्षाच्या नावावर देशात कोणताही पक्ष असेल तर तो फक्त भाजपच आहे

माझ्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू होत आहे
प्रसाद म्हणाले, 'मी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि सर्व भाजप नेत्यांचे आभार मानतो. राजकीय जीवनातल्या एका नव्या अध्यायची ही सुरुवात आहे. मा तीन पिढ्यांपासून कॉंग्रेससोबत संबंध आहे. विचारविनिमय आणि विचारमंथनानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मी कोणता पक्ष सोडत आहे असा प्रश्न नाही. प्रश्न असा आहे की मी कोणत्या पक्षाकडे जात आहे आणि का जात आहे? काही वर्षांपासून असे जाणवते की आज जर देशात खर्‍या अर्थाने कोणताही राजकीय पक्ष असेल तर तो भाजप आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणजे भाजपा.

गोयल म्हणाले - PM मोदी यांच्यावर प्रभावित होऊन पक्षात प्रवेश केला
पीयूष गोयल म्हणाले, 'आज जितिन प्रसाद आमच्यासोबत आहेत. ते उत्तर प्रदेशचे नेते आहेत. भाजपच्या धोरणामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रभावित होऊन ते पक्षात येत आहेत. त्यांनी कॉंग्रेस संघटनेत अनेक पदांवर काम केले आहे. ते मंत्रीही राहिले आहेत.

पीयूष गोयल म्हणाले की, जितिन प्रसाद यांनी अगदी लहान वयातूनच आपले संपूर्ण आयुष्य उत्तर प्रदेशच्या सेवेसाठी दिले आहे. मला अजूनही आठवत आहे की ते 27 वर्षांचे होते यावेळी अचानक त्यांच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा ते मुंबईमध्ये काम करत होते. त्यांनी दिल्लीतील श्री राम कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. कमी वयातच या कुटुंबाला मोठा धक्का बसला. अगदी लहान वयातच त्यांनी उत्तर प्रदेशात दौरा केला. वेगवेगळ्या जिल्ह्यांत जाऊन त्यांनी आपल्या कलागुण आणि कामगिरीने लोकांची मने जिंकली. ते शाहजहांपूरचे खासदार झाले. त्यांनी उत्तर प्रदेशच्या राजकारणात जी भूमिका निभावली, ती आपण सर्वांनी पाहिली आहे.

बातम्या आणखी आहेत...