आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता राेजगारवृष्टी:राज्यात 2 हजार उमेदवारांना नियुक्तिपत्रे प्रदान, वर्षभरात 75 हजार पदांवर करणार नियुक्त्या

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • {आठवडाभरात १८,३३१ पोलिस भरतीची जाहिरात
  • { महिनाभरात ग्रामविकास विभागात १०,५०० पदे भरणार,

अतिवृष्टीमुळे वैतागलेल्या नागरिकांंसाठी दिलासादायक बातमी. राज्यामध्ये आता रोजगाराची वृष्टी होणार आहे. त्या दृष्टीने पहिला टप्पा म्हणून गुरुवारी राज्यभरात सुमारे २ हजार उमेदवारांना नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. याचा मुख्य सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झाला. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यांतर्गत कोकण विभागातील ६०० पात्र उमेदवारांना नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली.

राज्यात सुमारे दोन हजार उमेदवारांना विभागीय पातळीवर नियुक्तिपत्र प्रदान करण्यात येत आहे, असे सांगून रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नियुक्तिपत्र मिळालेल्या राज्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले तसेच नगरविकास विभागाच्या १४ हजार कोटींच्या प्रस्तावास केंद्राची मान्यता मिळाली आहे. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असे ते म्हणाले.

पदभरतीत आमूलाग्र बदल : फडणवीस येत्या आठवडाभरात १८ हजार ५०० पोलिस भरतीची जाहिरात काढत आहोत. एका महिनाभरात ग्रामविकास विभागात १० हजार ५०० पदांची भरती करणार आहोत. सर्व विभागांमध्ये पदभरतीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी अनेक पदे लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार आहेत. विभागाकडून पदभरतीतही आमूलाग्र बदल करणार आहोत. येत्या वर्षभरात सर्व पदभरती करून या सर्व नियुक्त्या आम्ही देणार आहोत. तसेच जी पदे रिक्त होतील त्यांचीही भरती केली जाईल, असे फडणवीस म्हणाले.

१ लाख खासगी नोकऱ्यांसाठी करार कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत. शासकीय विभागाबरोबर खासगी क्षेत्रातही १ लाख नोकऱ्या उपलब्ध होण्यासाठी शासन विविध संस्थांबरोबर करार करणार आहे. देशात जे ८० हजार नोंदणीकृत स्टार्टअप आहेत, त्यातील पंधरा हजार फक्त महाराष्ट्रातील आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

वर्ग-३ लिपिकपदे लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत { पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील सुमारे ६०० उमेदवारांना मुंबईत झालेल्या कार्यक्रमात नियुक्ती आदेश प्रदान. { गृह विभागाच्या पोलिस शिपाई, पोलिस चालक व सशस्त्र पोलिस या पदांची १८ हजार ३३१ पदांची जाहिरात महिनाभरात प्रसिद्ध करण्यात येणार. { ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा परिषद व क्षेत्रीय कार्यालयातील पदे भरण्यासाठी १० हजार ५०० पदांची जाहिरात प्रसिद्ध आठवडाभरात. { राज्यसेवा २०२२ यामध्ये ६२३ जागांसाठी सुधारित जाहिरात प्रसिद्ध. { वर्ग-३ मधील लिपिकाची राज्यातील सर्व रिक्त पदे लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रासाठी २ लाख कोटींचे प्रकल्प मंजूर, रेल्वेसाठी ७५ हजार कोटी : पंतप्रधान मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे संदेश दिला. नियुक्तिपत्र प्राप्त उमेदवारांचे त्यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले, केंद्राने महाराष्ट्रासाठी दोन लाख कोटींचे प्रकल्प मंजूर केले आहेत. यातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. मुद्रा योजनेद्वारे तरुणांना स्वयंरोजगारासाठी २० लाख कोटी रुपयांची मदत केली. याचा मोठा लाभ महाराष्ट्रातील तरुणांनाही झाला. महाराष्ट्रात रेल्वेसाठी ७५ हजार कोटी रुपये व रस्ते विकासासाठी ५० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले आहेत, असे मोदी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...