आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोण आहेत जोगेंद्र कवाडे:खासदार, आमदार आणि ऐतिहासिक लॉंगमार्चचे प्रणेते, मुंबईतला डॉन हाजी मस्तानसोबत काढला होता पक्ष

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दलित समाजातील मोठे नेते, माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या युती ठरली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आधी दलित पँथर आणि आता कवाडे यांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंवर कुरघोडी करणार असल्याचे बोलले जात आहे. आंबेडकरवादी सामाजिक चळवळ व कट्टर आंबेडकरवाद्यांमध्ये कवाडे सरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. दलित-बौद्ध चळवळीतील एक उल्लेखनिय सामाजिक कार्यकर्ते असून ऐतिहासिक लॉंगमार्चचे प्रणेते अशी कवाडे यांची ओळख आहे.

जोगेंद्र कवाडे यांनी मुंबईचा डॉन म्हणून लोकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या हाजी अली मस्तानसोबत ‘दलित-मुस्लिम सेक्युरिटी फेडरेशन’ पक्षाची स्थापना केली. 1990 मध्ये या पक्षाचे नाव बदलून ‘फेडरेशन ऑफ इंडियन मायनॉरिटीज’ हे ठेवण्यात आले होते. हिंदू-मुस्लीम मतांची व्होट बँक एकत्र आणून काँग्रेसला धक्का देण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

डॉन हाजी अली मस्तानसोबत जोगेंद्र कवाडे यांनी युती केली होती.
डॉन हाजी अली मस्तानसोबत जोगेंद्र कवाडे यांनी युती केली होती.

जोगेंद्र कवाडे राजकारणी, समाजसेवक, माजी प्राध्यापक व पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. ते चिमूर लोकसभा मतदार संघातून 12व्या लोकसभेवर निवडून गेले होते. सध्या ते जून 2014 पासून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी त्यांनी हजारो भीमसैनिकांना घेऊन औरंगाबादपर्यंत लाँगमार्च काढला होता. त्यांचा लढा आजही अनेकांच्या स्मरणात आहे.

जोगेंद्र कवाडे यांचा जन्म 1 एप्रिल 1943 रोजी नागपूरमध्ये झाला. ते बौद्ध धर्मीय आहेत. 4 एप्रिल 1977 रोजी त्यांचा विवाह रंजना कवाडे यांचेशी झाला. या दांपत्याला 1 मुलगा व 2 मुली आहेत. कवाडे यांनी नागपूर विद्यापीठातून (सध्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) एम.कॉम. ही वाणिज्य शाखेतील मास्टर पदवी ग्रहन केली आहे. नागपूर येथून 1972 पासून निघणाऱ्या जय भीम या मराठी साप्ताहिकाचे ते संपादक व प्रकाशक आहेत. याशिवाय त्यांनी अनेक मासिकांमध्ये व दैनिक वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिलेले आहेत.

दीक्षाभूमीवरील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ते वाणिज्य विषयाचे प्राध्यापक होते. 1976 मध्ये त्यांनी बौद्धांच्या सवलतीसाठी आंदोलन केले. त्यासाठी तिहार कारागृहात त्यांना दहा दिवस कारावास झाला. 1982 मध्ये त्यांनी दलित मुक्ती सेनेची स्थापना केली. अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला असून नेतृत्वही केले आहे. कवाडे हे माजी खासदार आहेत, ते 1998 मध्ये चिमूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते. तर 2014 मध्ये कवाडे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सदस्य (आमदार) होते. काँग्रेस पक्षासोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची 1997 पासून युती होती.

महाविकास आघाडीच्या कार्यकाळात राज्यातील दलितांवर अत्याचार वाढल्याची खंत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे (पीरिपा) संस्थापक अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केली होती.
महाविकास आघाडीच्या कार्यकाळात राज्यातील दलितांवर अत्याचार वाढल्याची खंत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे (पीरिपा) संस्थापक अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केली होती.

राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाने मित्रपक्षांना सोबत घेऊन त्यांना वाटा दिला होता. पण गेल्या काही महिन्यांपासून पीपल्स रिपब्लिकन पक्ष महाविकास आघाडीवर नाराज होते. गेली अडीच वर्षे महाविकास आघाडीत पीरिपाला मानसन्मान मिळाला नाही. सत्तेत वाटाही मिळाला नाही. पक्षाचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे येत्या काळात नव्या राजकीय मित्रांचा शोध घेतला जाईल, अशी भूमिका जोगेंद्र कवाडे यांनी घेतली होती.

एका बाजूला उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर हे एकत्र येत असल्याच्या चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदेंनी जोगेंद्र कवाडे यांच्याशी युती केली आहे. या महायुतीचा राज्याच्या राजकारणावर किती परिणाम होतो आणि या महायुतीला दलित समाजाचा कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

'शिवशक्ती-भीमशक्ती'ची घोषणा

राज्याला धाडसी मुख्यमंत्री लाभला आहे, असे म्हणत प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी बाळासाहेबांच्या सुतीसोबत युती केल्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री शिंदेवर आमचा विश्वास आहे, असे वक्तव्य जोगेंद्र कवाडे यांनी ​​​​केले आहे.​​ बाळासाहेबांची शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांची संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. या निमित्ताने शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे. पत्रकार परिषदेचे आयोजन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रा. जोगेंद्र कवाडे हे अधिकृतरित्या युतीची घोषणा केली आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.

बातम्या आणखी आहेत...