आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंडाचा हैदोस:मुंबईत ड्रग्जच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच हल्ला, उपनिरीक्षकासह 2 कर्मचारी जखमी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ड्रग्जच्या गुह्यातील आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिस पथकावरच हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. आरोपी घरी आल्याचे समजताच पोलिस त्याला पकडण्यासाठी गेले होते. मात्र, यावेळी आरोपी, त्याची आई व शेजारच्यांनी मिळून पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण केली. धक्कादायक म्हणजे त्यानंतर आरोपी पळून जाण्यातही यशस्वी झाला.

हल्लेखोरांवर गुन्हा दाखल

जोगेश्वरी येथे ही घटना घडली आहे. हल्ल्यानंतर रिझवान हा आरोपी फरार झाला आहे. तर, हल्ल्यामध्ये एक उपनिरीक्षक व दोन कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी हल्लेखोरांविरोधात मेघकाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर, फरार आरोपीलाही लवकरच अटक करु असे पोलिस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांनी सांगितले आहे.

7 एप्रिलरोजी गुन्हा दाखल

पोलिसांनी घटनेबाबत सांगितले की, जोगेश्वरीच्या प्रेम नगरात ही घटना घडली. 7 एप्रिल रोजी आरोपी रिजवानवर एनडीपीएसचा एक गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी रिजवान हा जोगेश्वरीच्या प्रेम नगर परिसरात असल्याचे समजताच त्याला पकडण्यासाठी उपनिरीक्षक शंकर पवळे, भालेराव, आवळे तसेच चव्हाण, नाईक, भोसले, सिंग, राठोड व महिला अंमलदार शिखरे असे पथक शनिवारी रात्री प्रेम नगरात गेले होते. त्या वेळी रिजवान तेथे एका गल्लीतून आत जाताना दिसला.

पोलिसांच्या हाताला चावा अन् आरोपी पळाला

पोलिसांनी लगेच रिजवानच्या पाठीमागून जात त्याला पकडले. रिजवानने लगेच पोलिसांनी पकडल्याची बोंबाबोंब करायला सुरूवात केली. तेक्हा घरात असलेल्या रिजवानच्या आईने खाली येऊन पोलिसांना शिवीगाळ करायला सुरूवात केली. त्यानंतर अन्य चार महिला घरातून खाली आल्या आणि त्यांनीही पोलिसांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. तसेच त्यातील एका महिलेने उपनिरीक्षक आवळे यांच्या उजक्या हाताला चावा घेतला व अन्य लोकांनी मारहाण केल्याने त्यात आवळे यांच्या हाताला व पायाला दुखापत झाली. तसेच महिला अंमलदारासह दोघे कर्मचारी जखमी झाले. त्याचा फायदा घेत रिजवानने पळ काढला.

आरोपी पळेपर्यंत पोलिसांना पकडून ठेवले

विशेष म्हणजे पोलिसांनी आरोपी रिजवानचा पाठलाग केल्याकर अन्य तिघांनी पोलिसांना पकडून ठेवले. तसेच, पोलिसांना दमदाटी, शिवीगाळ व धक्काबुक्की करणे सुरूच ठेकले. यात एक पोलीस अधिकारी व दोघे कर्मचारी जखमी झाले. अखेर त्या हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका करत पोलिसांनी मेघवाडी पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी मेघवाडी पोलीस ठाण्यात रिजवान, त्याची आई तसेच अन्य हल्लेखोर चार महिला, तीन पुरूषांविरोधात मेघवाडी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.