आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:32 वर्षे नायर रुग्णालयात काम केलेल्या कल्याण-डोंबिवलीच्या महापौरांना पुन्हा व्हायचेय परिचारिका

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद, महापालिका आयुक्तांना लिहिले पत्र

कल्याण-डोंबिवलीच्या विद्यमान महापौर विनीता विश्वनाथ राणे यांनी महापालिकेच्या रुग्णालयात परिचारिका म्हणून विनामूल्य सेवा देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्यासाठी त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे. राणे यांना परिचारिका सेवेचा ३२ वर्षांचा अनुभव आहे. कल्याण-डोंबिवली महापलिकेत सध्या शिवसेनेची सत्ता आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकाने कोरोना विरोधातील लढाईत योगदान द्यावे, असे आवाहन केले होते. त्यानुसार महापौर राणे यांनी परिचारिका म्हणून योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे डाॅक्टर्स, परिचारिका व कर्मचारी धास्तावलेले आहेत. त्यात महापौर राणेंचा निर्णय कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. 

आपल्या अनुभवाचा लाभ रुग्णांना व्हावा ही इच्छा  

महापौर राणे या बृहन्मुंबई महापलिकेच्या नायर रुग्णालयात ३२ वर्षे परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. त्या अनुभवाचा लाभ रुग्णांना व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. खासगी प्रयोगशाळेतल्या एका चाचणीस किमान ४५०० रुपये लागतात. त्यामुळे राणे यांनी महापौरांच्या विशेष अधिकार निधीतील ५० लाख रुपये खासगी प्रयोगशाळेतील चाचण्यांसाठी वापरण्यात यावेत, अशी अनुमती आयुक्तांना दिली आहे.

‘काॅल आॅन रिक्षा’ प्रयोग 

सध्या लाॅकडाऊनमुळे घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. सार्वजनिक वाहतूक बंद आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापौर राणे यानी पालिका क्षेत्रात ‘काॅल आॅन रिक्षा’ हा प्रयोग राबवला आहे. रिक्षाचालकांचे फोन नंबर जाहीर केले असून गरजूंना या रिक्षा मीटरच्या भाड्यावर उपब्लध होत आहेत. तसेच आपले तीन महिन्याचे मानधन महापौरांनी मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...