आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शब्दांचे वार:कमळाबाईंची नजर आता काँग्रेसवर भाजप : तुम्हाला पेंग्विन सेना म्हणायचे का?

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या मुखपत्रात एक लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात भाजपचा उल्लेख ‘कमळाबाई’ असा करण्यात आला आहे. झारखंड, दिल्लीमध्ये ‘ऑपरेशन लोटस’चा प्रयत्न फसल्यानंतर भाजप अर्थात कमळाबाईची वाईट नजर आता काँग्रेसवर पडली आहे. पक्षांतर्गत नाराजीचा फायदा घेत महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये फूट पाडण्याची ‘हात’घाई भाजपकडून सुरू आहे, असे म्हटले आहे. यावरून भाजप आणि शिवसेनेत पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. आमच्या कमळाला हिणवायला बाई म्हणता, मग तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला आम्ही आता “पेंग्विन सेना’ म्हणायचे का? असा सवालही त्यांनी केला आहे.

बाळासाहेब ठाकरे भाजपला म्हणायचे कमळाबाई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे भाजपला भाजप न म्हणता कमळाबाई म्हणायचे. ही कमळाबाई राहते आमच्या पक्षात, पण हिचे लक्ष दुसऱ्या पक्षाकडे असते, असे ते एका भाषणात म्हणाले होते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा भाजप-शिवसेनेने एकमेकांची साथ सोडली तेव्हा “कमळाबाई आम्हाला सोडून गेल्या’ असे बाळासाहेब म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...