आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीकास्त्र:'कंगना तो एक बहाना है, बेबी पेंग्विन को बचाना है', नितेश राणे यांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारला सुशांत सिंह राजूपत आणि दिशा सालियन प्रकरणावरून लक्ष विचलित करायचे आहे - नितेश राणे

अभिनेत्री कंगना रनोटने मुंबई संदर्भात वक्तव्य केल्यानंतर कंगना आणि शिवसेना यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. या वादावर भाजप आमदार नितेश राणेंनी ट्विट करत ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 'कंगना तो एक बहाना है, बेबी पेंग्विन को बचाना है' असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.

निलेश राणे ट्विट मध्ये म्हणाले की, "कंगना तर फक्त बहाणा आहे. सुशांत सिंह राजूपत आणि दिशा सालियन प्रकरणावरून लक्ष विचलित करायचे आहे. बेबी पेंग्विनला वाचवायचे आहे. यापेक्षा जास्त काही नाही." नितेश राणेंच्या या ट्विटनंतर शिवसेना विरुद्ध कंगना पाठोपाठ शिवसेना विरुद्ध राणे असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर कंगना नरमली आहे. मुंबईबद्दलच्या आपल्या भावना तिने ट्विट करून व्यक्त केल्या. मुंबईने मला नेहमीच यशोदेसारखे सांभाळले आहे, असे कंगना म्हणाली आहे.