आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काही दिवसांपासून शिवसेना नेत्या आणि बॉलीवूड अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर आणि अभिनेत्री कंगना रानौत यांच्यात जोराचे खटके उडत आहेत. आता पुन्हा ऊर्मिलाने खार येथे घेतलेल्या ४ कोटी रुपयांच्या नवीन कार्यालयावरून कंगनाने तिच्याशी ‘पंगा’ घेतला आहे. ऊर्मिलास काँग्रेसमुळे खूप फायदा झाला, अशी खोचक टीका कंगनाने केली आहे. मात्र, राजकारणात सक्रिय होण्यापूर्वीच हे कार्यालय खरेदी केल्याचे सडेतोड उत्तर ऊर्मिलाने दिले आहे.
काँग्रेसमुळे ऊर्मिला यांना खूप फायदा झाला...
भाजपला पाठिंबा देऊन मला काहीच मिळाले नाही, पण ऊर्मिला यांना काँग्रेसमुळे खूप फायदा झाला. ऊर्मिलाजी, मी स्वतःच्या मेहनतीने घर विकत घेतले होते. पण काँग्रेस माझे घर तोडत आहे, शिवाय भाजपला खुश करून माझ्या हातात फक्त २५ ते ३० न्यायालयातले दावे पडले. मी तुमच्यासारखी समजूतदार असते तर काँग्रेसला खुश केले असते.’
२० वर्षांच्या कारकीर्दीनंतर स्वत:च्या मेहनतीवर खरेदी
कंगनाजी, २० - ३० वर्षांच्या कारकीर्दीनंतर २०११ मध्ये स्वत:च्या मेहनतीवर ही संपत्ती विकत घेतली होती. मार्च २०२० मध्ये लॉकडाऊनपूर्वी ती सदनिका विकल्याची कागदपत्रे आणि पुरावे आहेत. त्याच पैशातून मी विकत घेतलेल्या नव्या कार्यालयाचीही कागदपत्रे आहेत. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी झालेल्या व्यवहारातून कार्यालय विकत घेतले आहे.
खार येथे १०४० चौरस फुटांचे कार्यालय : ऊर्मिला यांनी खार १०४० चौरस फुटांचे कार्यालय खरेदी केले आहे. या जागेचा दर ३६ हजार प्रति चौरस फूट असून या कार्यालयाचा रेडीरेकनर दर ४ कोटींहून अधिक आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.