आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगना vs शिवसेना 9 वा दिवस:कंगनाच्या विरोधात ड्रग्स प्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासाला सुरुवात, अभिनेत्री म्हणते - अन्याय कितीही शक्तिशाली असला तरी विजय भक्तीचाच होतो

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्र सरकारने एक दिवसपूर्वीच कंगनाच्या विरोधात तपासाचे आदेश दिले होते
  • कंगनाचा एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुमनने अभिनेत्रीवर ड्रग्स घेत असल्याचे आरोप केले होते

मुंबई पोलिसांच्या अँटी नारकोटिक्स सेलने कंगना रनोटच्या विरोधात ड्रग्स प्रकरणी तपास करणे सुरू केले आहे. तिला चौकशीसाठी सोमवारी समन पाठवले जाऊ शकते. महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने शुक्रवारी कंगनाच्या विरोधात तपासाचे आदेश दिले होते. अभिनेत्रीचा एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुमनने तिच्यावर ड्रग्स घेण्याचे आरोप लावले होते.

तिकडे कंगनाने महाराष्ट्र सरकारवर आजही निशाणा साधला आहे. अभिनेत्रीने ट्विटरवर सोमनाथ मंदिराचा फोटो शेअर करुन लिहिले, 'सोमनाथला कित्येकांनी अनेक वेळा वाईट पध्दतीने ओसाड केले, पण इतिहास साक्षीदार आहे - क्रूरता आणि अन्याय कितीही शक्तिशाली असले, तरी अखेर विजय भक्तीचाच होतो, हर हर महादेव.'

कंगनाने म्हटले - महाराष्ट्रात सरकारची दहशत वाढत आहे
बीएमसीने बुधवारी कंगनाचे ऑफिस तोडले होते. यानंतर कंगना शिवसेनेवर सातत्याने निशाणा साधत आहे. तिने बीएमसीच्या कारवाईवर म्हटले होते की, मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत करुन चुक केली नव्हती. अभिनेत्रीने काल ट्विटवर एक मिनिटाचा व्हिडिओ शेअर करुन महाराष्ट्र सरकारवर दहशत आणि अत्याचार वाढत असल्याची टीका केली होती. तिने मुंबईमध्ये नेव्हीच्या माजी ऑफिसरसोबत कथित शिवसैनिकांची मारहाण आणि एका चीव्ही चॅनलच्या विरोधात राज्य सरकारच्या कारवाईचा उल्लेख केला आहे.