आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगना विरुद्ध बीएमसी:कार्यालय तोडल्यानंतर आता कंगनाच्या हाउसिंग सोसायटीला सुद्धा बीएमसीने पाठवली नोटिस, 5 प्रश्नांची उत्तरे मागितली

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने कार्यालय तोडफोडनंतर बीएमसीकडे 2 कोटी रुपयांची भरपाई मागितली

वादग्रस्त अभिनेत्री कंगना रनोटच्या पाली हिल कार्यालयातील अनाधिकृत बांधकाम तोडल्यानंतर आता बृहन्मुंबई महानगर पालिकेने कंगनाच्या हाउसिंग सोसायटीला नोटिस बजावले आहे. या नोटिसमध्ये कंगनाचे घर असलेल्या चेतक सोसायटी संदर्भात 5 शंका विचारण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सोसायटीच्या प्रमुख आणि सदस्यांच्या माहितीचा तपशीलही मागितला आहे. कंगनाचे कार्यालय तोडल्याच्या 6 दिवसानंतर नोटिस बजावून प्रशासन आता तिच्या सोसायटीत सुद्धा तोडफोड करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बीएमसीने मागितला 5 गोष्टींचा तपशील

  • सोसायटीचे प्रमुख, सदस्य आणि पार्टनर्सची यादी
  • गेल्या 3 वर्षांत सोसायटीच्या बैठका, बँक खात्यांचा तपशील
  • निवडणूक प्रक्रियेत सदस्यांची ट्रांसफर लिस्ट
  • रेल हाउस आणि बंगल्यांच्या मंजुरीचा तपशील
  • करारासह इतर कागदपत्रांची माहिती

कार्यालय तोडफोडनंतर कंगनाने मागितली 2 कोटींची भरपाई

कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयात बीएमसीने तोडफोड केल्यानंतर अभिनेत्रीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर तिने सुधारित याचिका करून मुंबई महानगरपालिकेकडून झालेल्या नुकसानच्या बदल्यात 2 कोटी रुपयांची भरपाई मागितली होती. या घडामोडींमध्ये तिने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच केंद्रीय मंत्री आणि रिपाइं नेते रामदास आठवले यांनी सुद्धा राज्यपालांची भेट घेऊन कंगनाची बाजू मांडली होती.

कंगनाने पाली हिल येथील बंगला 2017 मध्ये खरेदी केला होता. याचवर्षी तिने बंगल्यात डागडुजी आणि रिनोवेशनचे काम केले. तिने या बंगल्यात कार्यालय आणि घर असे दोन्ही केले होते. परंतु, यासाठी तिने परवानगी घेतली नव्हती असे म्हणत मुंबई महापालिकेने तिला नोटिस बजावली. सोबतच, 1979 च्या नियोजननुसार हा बंगला रहिवासी असल्याचा दावा करण्यात आला होता.