आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगना प्रकरण:'तुम्ही चूक केली आहे, आतातरी सुधारणा करा, कंगनापासून दूर राहा' गृहमंत्री अनिल देशमुखांना हिमाचल प्रदेशमधून धमकीचे 9 फोन

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गृहमंत्री अनिल देखमुखांना धमकीचे हे फोन वेगवेगळ्या क्रमांकांवरुन येत आहेत.

अभिनेत्री कंगना रनोटने महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली आणि नंतर मोठा वाद सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी तिच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुखांना हिमाचल प्रदेशमधून सातत्याने धमकीचे फोन येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत गृहमंत्र्यांना नऊ धमकीचे फोन आले आहेत.

मंगळवारी गृहमंत्र्यांना धमकीचे 7 फोन आले आहेत. कंगनापासून दूर राहा, तुम्ही चुक केली आहे, आतातरी सुधारणा करा' अशी धमकी देणारे फोन मंगळवारी आले. त्यानंतर आज म्हणजेच 9 सप्टेंबरला देखील पहाटे धमकीचे दोन फोन येऊन गेले आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत गृहमंत्र्यांना या प्रकरणी 9 धमकीचे फोन आलेत.

गृहमंत्री अनिल देखमुखांना धमकीचे हे फोन वेगवेगळ्या क्रमांकांवरुन येत आहेत. या फोननंतर मुंबई पोलिसांनी तपास करण्यास सुरूवात केली आहे. या फोनमध्ये कंगनावरुन कारवाई मागे घेण्याचे सांगितले जात आहे. तसेच आम्ही जे सांगत आहोत ते करा अन्यथा परिणाम वाईट होतील असंही सांगितलं जात आहे. यामुळे मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.

ड्रग्सप्रकरणी होणार कंगनाची चौकशी
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ड्रग्ज प्रकरणात कंगना रनोटचीही चौकशी केली जाईल हे स्पष्ट केलं आहे. अभिनेत्री कंगना रनोट हिचे अध्ययन सुमनशी प्रेमसंबंध होते. त्याने एका मुलाखतीमध्ये बोलताना असं सांगितलं होतं की कंगना ड्रग्ज घेते आणि मलाही घेण्यासाठी बळजबरी करते. त्यामुळे या प्रकरणी आता मुंबई पोलीस चौकशी करतील असंही अनिल देशमुखांनी स्पष्ट केलं आहे.

काय आहे प्रकरण?
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आणि मुंबईत पुन्हा पाऊल ठेवू नकोस असा इशारा दिला. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर ‘आझादी’च्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?, असा प्रश्न कंगनाने ट्विटरवरुन विचारला होता.

त्यानंतर कंगनाने आणखी एक ट्विट करत, ‘बरेच लोकं मला मुंबईत परत येऊ नकोस अशी धमकी देत आहेत. म्हणून मी येत्या आठवड्यात 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेन तेव्हा पोस्ट करेन. कोणाच्या बापाची हिंमत असेल तर थांबून दाखवा’, असे प्रत्युत्तर दिले होते..

यावर आता संजय राऊत म्हणाले की, “धमकी वगैरे देण्याची मला सवय नाही, आम्ही अ‍ॅक्शन घेतो, महाराष्ट्रात कमावते, खाते, मुंबई पोलीस त्यांचे रक्षण करते आणि त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

बातम्या आणखी आहेत...