आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्णबला बेड्या, कंगना भडकली:किती घरे तोडणार आणि किती तोंड दाबणार? सोनिया सेना; पेंग्विन सेना म्हटल्याचा राग येतो का? ते तर तुम्ही आहातच!

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुम्ही एक आवाज बंद कराल, तर अनेक आवाज उठतील - कंगना रनोट

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस चौकशीसाठी आज त्याच्या घरी पोहोचले असता, त्याने पोलिसांची दीड तास हुज्जत घातली होती. यानंतर पनवेल पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणावरुन आता अभिनेत्री कंगना रनोटने शिवसेनेवर घणाघात केला. सोनिया सेना आणखी किती घरे तोडणार आणि किती तोंड दाबणार? असा सवाल कंगनाने विचारला आहे.

अर्णव गोस्वामी अटक प्रकरणानंतर कंगनाने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर शिवसेनेवर हल्लाबोल केला. व्हिडिओत ती म्हणाली की, “मला महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारायचा आहे की, आज तुम्ही अर्णव गोस्वामी यांच्या घरी जाऊन त्यांना मारले, त्रास दिलात. तुम्ही अजून किती घरे तोडणार आहात, अजून किती लोकांचे गळे दाबणार आहात? सोनिया सेना किती आवाज बंद करणार आहे? परंतु हा आवाज वाढत जाणार आहे”.

कंगना पुढे म्हणाली की, “स्वातंत्र्यासाठी, अधिकारांसाठी ज्या लोकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत असे अनेक लोक शहीद झाले आहेत. तुम्ही एक आवाज बंद कराल, तर अनेक आवाज उठतील. तुम्हाला कोणी पेंग्विन म्हटल्यावर राग का येतो? लोक तुम्हाला पप्पू सेना म्हणतात तेव्हा तुम्हाला राग येतो? परंतू तुम्ही पप्पूसारखे काम कराल तर तुम्हाला पप्पूसेनाच म्हणतील. सोनिया सेना म्हटल्यावर तुम्हाला राग येतो, परंतु तुम्ही सोनिया सेनेचे लोक आहातच”. असा घणाघात कंगनाने शिवसेनेवर केला.