आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Kangana Ranaut Lashes Out At Maharashtra's Uddhav Thackeray Government After Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh Letter Surfaced

महाराष्ट्र सरकार vs कंगना रनोट:गृहमंत्री देशमुखांवर लावलेल्या आरोपांवर कंगना म्हणाली - 'मी हरामखोर नाही तर खरी देशभक्त आहे हे सिद्ध झाले'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'त्यांनी बेकायदा पध्दतीने माझे घर तोडले, तेव्हा अनेक लोकांनी आनंद साजरा केला होता.'

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप लावले आहेत. यानंतर अभिनेत्री कंगना रनोटने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तिने सोशल मीडियावर लिहिले की, 'जेव्हा मी महाराष्ट्र सरकार आणि आजारी प्रशासनाविरोधा आवाज उठवला होता, तेव्हा मला शिव्या, धमक्या आणि टीकेचा सामना करावा लागला होता. मात्र जेव्हा माझ्या लाडक्या शहरासाठी माझ्या निष्ठेवर प्रश्न उठवण्यात आला तेव्हा गपचुप रडले. तेव्हा त्यांनी बेकायदा पध्दतीने माझे घर तोडले, तेव्हा अनेक लोकांनी आनंद साजरा केला होता.'

'मी खरी देशभक्त आहे, हरामखोर नाही'
कंगनाने पुढे लिहिले की, 'भविष्यात ते ( उद्धव ठाकरे सरकार) पूर्णपणे उघडकीस येतील. आज मी पुष्टीसह उभी आहे, म्हणूनच हे सिद्ध होते की माझे शूर राजपुताना रक्तामध्ये माझे आणि माझ्या कुटुंबाचे पालन-पोषण करणाऱ्या देशा प्रति निष्ठा आणि खरे प्रेम वाहते. मी खरी देशभक्त आहे, हरामखोर नाही.'

काय आहेत आरोप?

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले असल्याचा खळबळजनक आरोप पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. वाझे यांनी स्वतः येऊन आपल्याला या वसूलीच्या कथित टार्गेटची माहिती दिली असल्याचेही ते म्हणाले. एवढेच नव्हे, तर हे पैसे कुठून आणि कसे घ्यायचे याची प्लॅनिंग सुद्धा वाझेंना गृहमंत्र्यांनी दिली होती असे सिंह यांनी पत्रात म्हटले आहे. परमबीर सिंह यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विरोधकांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...