आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कंगना vs जया बच्चन:जयाजी आणि त्यांच्या इंडस्ट्रीने कोणतेही ताट दिले नाही; हे माझे स्वतःचे ताट, सलग दुसऱ्या दिवशी कंगनाने साधला जया बच्चन यांच्यावर निशाणा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाने ट्विट केले - मी या इंडस्ट्रीला फॅमिनिज्म शिकवले, ताट देशभक्ती, नारी प्रधान चित्रपटांनी सजवली
  • जया बच्चन मंगळवारी रविकिशन यांना म्हणाल्या होत्या - ज्या ताटात जेवतात, त्यातच छिद्र करु शकत नाही

समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत बॉलिवूडमधील ड्रग्जच्या मुद्यावर विधान केले. यावरुन वाद वाढत आहेत. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने मुंबईत अमिताभ बच्चन यांच्या घराची सुरक्षा वाढवली. दुसरीकडे अभिनेत्री कंगना रनोटने सलग दुसर्‍या दिवशी जया बच्चन यांच्यावर पलटवार केला आहे.

कंगनाने ट्विट केले की, 'कोणते ताट दिले आहे जयाजी आणि त्यांच्या इंडस्ट्रीने? मी या इंडस्ट्रीला फॅमिनिज्म शिकवले. ताट हे देशभक्ती, नारी प्रधान चित्रपटांनी सजवली. हे माझे ताट आहे जयाची तुमचे नाही.'

कंगनाने म्हटले, शो बिझनेस नेहमी विषारी राहिला आहे
कंगना म्हणाली, 'शो बिझनेस नेहमी विषारी राहिला आहे. लाइट आणि कॅमेऱ्याच्या या दुनियेत लोक विश्वास ठेवतात आणि यातच जगतात. लोक एका वैकल्पिक सत्यतेवर विश्वास ठेवू लागतात आणि आपल्या चहुबाजूने एक रिंगण बनवतात. या भ्रमातून बाहेर पडण्यासाठी एक मजबूत आध्यात्मिक शक्तिची गरज असते.'

कंगना म्हणाली की, लोकशाहीत संविधानाचे कर्तव्य आहे की, क्रांतिकारी आवाजाला सुरक्षा द्यावी. येथे या प्रकरणात तुम्ही लोकशाहीमध्ये दोन गोष्टी पाहतात, 1- बचाव करणारा , 2- ज्याने बचाव केला. लोक दोन्हीही बनू शकत नाही. असे काही तरी बना जे देशासाठी महत्त्वाचे असेल.

जया म्हणाल्या होत्या - ज्या ताटात तुम्ही जेवतात त्यातच छित्र करु शकत नाही
जया बच्चन म्हणाल्या होत्या की, 'काही लोकांमुळे आपण संपूर्ण इंडस्ट्रीची प्रतिमा खराब करू शकत नाही. मला लाज वाटते की काल चित्रपटसृष्टीतील लोकसभेतील आमच्या एका सदस्याने त्याविरूद्ध भाषण केले. हे लाजीरवाणे आहे. आपण ज्या ताटात जेवतो त्यातच छिद्र करु शकत नाही.' जाय बच्चन यांचे हे विधान सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडसोबत कंगनाचा असलेल्या विवाद आणि भाजप खासदार रवी किशनच्या लोकसभेत दिलेल्या वक्तव्याशी जोडून पाहिले जात आहे.