आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअँटिलिया प्रकरणामध्ये वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्या अटकेवर आता अभिनेत्री कंगना रनोटही मैदानात उतरली आहे. तिने वाझे यांच्यावर सोशल मीडिया पोस्ट करत म्हटले की, 'या प्रकरणाचा योग्य दिशेने तपास झाला तर महाराष्ट्र सरकार कोसळेल.'
कंगनाने पोस्ट केले - 'माझे एक्स-रे येथे मोठ्या षडयंत्राचा तपास करु शकतात, शिवसेनेकडून सत्तेत आल्यानंतर त्यांना (वाझेंना) सस्पेंड करण्यात आले होते नंतर पुन्हा त्यांना परत आणले. जर योग्य प्रकारे तपास झाला तर केवळ लपलेले सांगाडेच बाहेर निघणार नाहीत, तर महाराष्ट्र सरकारही कोसळेलही,मी आणखी 200 एफआयआर दाखल करू शकते, जय हिंद. '
कंगना आणि राज्य सरकारमध्ये यापूर्वीही झाला आहे वाद
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणामध्ये कंगना महाराष्ट्र पोलिस आणि उद्धव ठाकरे सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहे. गेल्या वर्षी हे प्रकरण चर्चेत असताना मुंबई महापालिकेने (BMC) ने मुंबई येथील कंगनाच्या कार्यालयाचा काही भाग अवैध असल्याचे सांगत पाडला होता. कंगनाने या कारवाईविरोधात मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.
सचिन वाझेंवर कोणते आरोप?
अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुुवारीला स्फोटकं असलेली स्कॉर्पियो मिळाली होती. या प्रकरणाचा तपास NIA करत आहे. या प्रकरणात सचिन वाझेंना NIA ने अटक केली आहे. ज्या स्कॉर्पियोमध्ये स्फोटके मिळाली होती ती कार मनसुख हिरेनची यांची होती. 5 मार्चला मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या कलवा क्रीकजवळ सापडला होता. पोलिसांचा अंदाज होता की, त्यांनी क्रीकमध्ये उडी मारुन आत्महत्या केली. त्यांच्या तोंडावर पाच रुमाल बांधलेले होते. यावरुन त्यांच्या खूनाचा संशय बळावला होता.
मनसुख यांच्या पत्नी विमला यांनी वाझे यांच्यावर पतीचा खून केल्याचा आरोप केला. विमला म्हणाल्या की मृत्यूच्या आदल्या रात्री वाझे यांनी त्यांच्या पतीला फोन करुन बोलावले होते. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. नंतर, महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या पत्राचा संदर्भ घेत NIA या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.