आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कंगनाच्या अडचणीत वाढ:ड्रग्स प्रकरणी होणार कंगना रनोटची चौकशी; गृहमंत्री अनिल देशमुखांची विधानसभेत माहिती, अध्ययन सुमनच्या मुलाखतीचा घेतला आधार

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रताप सरनाईक आणि सुनील प्रभूंनी केली होती तक्रार

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर कंगना रनोट चांगलीच वादात सापडली आहे. आता ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री कंगना रनोटचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत दिली.

कंगनाने मुंबईविषयी अपशब्द उच्चारले आणि यानंतर तिच्यावर टीकेचा भडीमार सुरू झाला. दरम्यान मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगनाविरोधात कारवाई केली जावी यासंदर्भात प्रताप सरनाईक यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावर उत्तर देत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ड्रग्ज प्रकरणात कंगना रनोटचीही चौकशी केली जाईल हे स्पष्ट केलं आहे.

अभिनेत्री कंगना रनोट हिचे अध्ययन सुमनशी प्रेमसंबंध होते. त्याने एका मुलाखतीमध्ये बोलताना असं सांगितलं होतं की कंगना ड्रग्ज घेते आणि मलाही घेण्यासाठी बळजबरी करते. त्यामुळे या प्रकरणी आता मुंबई पोलीस चौकशी करतील असंही अनिल देशमुखांनी स्पष्ट केलं आहे.