आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लॅटमध्ये अवैध बांधकाम प्रकरण:​​​​​​​कंगना रनोटने BMC विरोधात दाखल केलेली तक्रार बिनशर्त घेतली मागे

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका महिन्यात अवैध बांधकाम हटवण्यास सांगितले होते

अभिनेत्री कंगना रनोटने बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) वर दाखल केलेला खटला बिनशर्त मागे घेतला आहे. 2018 मध्ये, अभिनेत्रीच्या खारमधील घरात (फ्लॅट) बेकायदेशीर बांधकाम केल्याबद्दल पालिकेने नोटीस पाठवली होती. त्यानंतर अभिनेत्रीने मुंबई उच्च न्यायालयात संपर्क साधून ही नोटीस रद्द करण्याची विनंती केली होती. कंगनासाठी खटला लढवणारे वकील वीरेंद्र सराफ यांनी आज हा खटला मागे घेतल्याचे कोर्टाला कळवले आहे.

कोर्टाने आज सुनावणीदरम्यान हे स्पष्ट केले की, अभिनेत्री पुढील चार आठवड्यांत फ्लॅमध्ये झालेले बांधकाम नियमित करण्यासाठी अर्ज करू शकते आणि तोडफोड कारवाईपूर्वी बीएमसीला त्यावर एक निर्णय घ्यावा लागेल. जर बीएमसीचा आदेश कंगनाच्या विरोधात असेल तर अर्ज फेटाळल्यानंतर दोन आठवड्यांपर्यंत ती पुन्हा न्यायालयात हजर होऊ शकते. यावर कंगनाच्या वकिलांनी आणखी दोन अतिरिक्त आठवडे मागितले.

बिनशर्त मागे घेतला खटला
यापूर्वी कंगनाने डेव्हलपरद्वारे केलेल्या बांधकामात कोणतेही बदल केले नसल्याचे सांगितले जात होते. यावर महापालिकेने विरोध व्यक्त केला होता. नंतर न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी कंगनाच्या वकिलाला विचारले की केस कोणत्या अटींवर मागे घेत आहात की, बिनाशर्त मागे घेत आहात. वकिलांनी सांगितले की ते कोणत्याही अटीशिवाय केस मागे घेत आहोत.

BMC ने सोनू सूदचाही दाखला दिला
बीएमसीची केस लढत असलेले वकील अस्पी चिनॉय यांनी अभिनेता सोनू सूदच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा दाखला दिला. ज्यामध्ये कोर्टाने म्हटले होते की, बीएमसी द्वारे बनवण्यात आलेल्या कायद्यानुसार सोनूच्या अर्जावर निर्णय घेतला जाईल. तर कंगनाचे वकील म्हणाले होते की, सोनू सूद प्रकरणामध्ये बीएमसीने नियमित करण्यासाठीचा कंगनाचा अर्ज फेटाळून लावावा आणि दुसर्‍याच दिवशी पुन्हा तिचे घर पाडले पाहिजे असे उदाहरण नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन कोर्टाने अखेर बीएमसीच्या आदेशानंतर कंगनाला 2 आठवड्यांचा कालावधी दिला.

कंगनाचे एकाच इमारतीत तीन फ्लॅट
बीएमसीने सप्टेंबर 2020 मध्ये कंगनाच्या घरात बेकायदेशीर बांधकाम असल्याचे म्हणत नोटीस बजावली होती. कंगना रनोट मुंबईच्या खार वेस्ट येथील DB Breeze ( Orchid Breeze ) च्या 16 नंबर रोडच्या एका इमारतीत 5 व्या मजल्यावर राहते. या मजल्यावर कंगनाचे एकूण 3 फ्लॅट आहेत. ज्यामध्ये एक फ्लॅट 797 Sqft +दूसरा फ्लॅट 711Sqft + तिसरा फ्लॅट459 Sqft चा आहे. हे तिन्हीही फ्लॅट कंगनाच्या नावावर 8 मार्च 2013 मध्ये रजिस्टर्ड झाले आहेत.

एका महिन्यात अवैध बांधकाम हटवण्यास सांगितले होते
कंगनाने फ्लॅट घेतल्याच्या 5 वर्षांनंतर 13 मार्ज 2018 मध्ये बीएमसीला या फ्लॅटमध्ये अनिधकृत बांधकाम असल्याची तक्रार मिळाली होती. तक्रारीनंतर 26 मार्च 2018 मध्ये बीएमसीकडून कंगनाच्या तीन फ्लॅटची तपासणी करण्यात आली आणि त्याच दिवशी कंगना ला BMC Under 53/1 of MRTP act for unauthorized construction beyond plan नुसार नोटीस पाठवली होती. या नोटीसला 27 मार्च 2018 ला बीएमसीने मंजूरी दिली होती.

या नोटीसमध्ये बीएमसीने कंगना रनौतला एक महिन्यात बीएमसीचे अनधिकृत बांधकाम हटवायला सांगितले किंवा त्यावर उत्तर देण्यासाठी बीएमसीला सांगितले.

बातम्या आणखी आहेत...