आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेली अभिनेत्री कंगना रनौत हिने रविवारी पुन्हा व्हिडिओ जारी करून वादात तेल ओतले. ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणारच, असे सांगून तिने शिवसेना खासदार संजय राऊत यांना आव्हान दिले. राऊत यांनी कंगनाला उद्देशून अपशब्द वापरला होता. त्याचा हवाला देऊन कंगना म्हणते, मला शिवी दिल्याने तुमची मानसिकताच दिसून आली. मुंबई पोलिस किंवा तुमच्यावर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान करते आहे असे होत नाही. तुम्ही (राऊत) म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही धमकी दिली तरीही ९ सप्टेंबरला मी येणारच आहे. राऊत यांनी मुलींचा अपमान केला असल्याचा आरोप करून ‘भारत की बेटियाँ’ तुम्हाला माफ करणार नाही, असे कंगना म्हणाली. देशात राहण्याची भीती वाटते, असे आमिर खान म्हणाला त्या वेळी त्याला कुणी शिवी दिली नाही, असे कंगनाने म्हटले आहे.
अहमदाबादबद्दल बोलशील का : संजय राऊत
मुंबईला तिने मिनी पाकिस्तान म्हटले आहे. अहमदाबादबद्दल असे वक्तव्य करण्याची हिंमत कंगना रनौतमध्ये आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तिने महाराष्ट्राची माफी मागितली तर माफ करण्याविषयी विचार करेन, असे ते म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.