आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सभागृहात कंगना विरोध:मुंबईत खाऊन पिऊन तरारलेली मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या टाकते, विधिमंडळात निंदा करायला हवी - शिवसेना

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्र जितका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा आहे तितकाच तो भाजपचाही असायलाच हवा

अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना राणावत बॉलिवूडमधील कलाकारांवर टीका करत होती. कंगणाने सुशांतच्या प्रकरणावरून मुंबई पोलिसांवरही निशाणा साधला. मुंबई पोलिस आणि मुंबईवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने कंगनावर चहुबाजूने टीकेची झोड उठली होती. कंगनाच्या याच बेताल वक्तव्यांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधला आहे.

मुंबईत खाऊन, ‘पिऊन’ तरारलेली एक महिला फिल्मी कलावंत मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या टाकते हे सहन करता येणार नाही आणि राज्याच्या विधिमंडळात या प्रकाराची निंदा करायलाच हवी, असे संजय राऊत यांनी अग्रलेखात म्हटलं आहे.

मुंबईसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचा अपमान करणाऱ्या विरोधात पक्षभेद मोडून आवाज उठवावा

विरोधी पक्षांकडून सुशांतसिंह राजपूत, कंगना राणावत अशा ‘राष्ट्रीय हितांच्या’ विषयांवर प्रश्न उपस्थित केले जातील. मुंबई म्हणजे पाकव्याप्त काश्मीर अशी वक्तव्ये करून मराठी जणांचा अपमान करणाऱ्या, मुंबईसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचा अपमान करणाऱ्या उपऱ्या व्यक्तीविरोधात सभागृहात पक्षभेद मोडून आवाज उठायलाच हवा आणि त्यात विरोधी पक्षनेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा, असे अग्रलेखात म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान ही मंडळी कसा काय सहन करू शकतात?

तसेच महाराष्ट्र जितका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा आहे, तितकाच तो भाजपचाही असायलाच हवा. महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान ही मंडळी कसा काय सहन करू शकतात?, असा सवाल शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून विरोधी पक्षाला केला आहे.

विरोधीपक्ष चिंताजनक परिस्थितीवर सभागृहात धडपणे चर्चा करू देतील का?

अग्रलेखात म्हटले की, आज महाराष्ट्रापुढील नेमके प्रश्न काय आहेत? देशातील कोरोना रुग्णांची संख्या 40 लाखांवर गेली आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 20 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. पुणे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक आहे. मुंबईत शनिवारी 1800 तर ठाण्यात 1600 नव्या रुग्णांची भर पडली. हे चित्र चांगले नाही. आरोग्य हीच आताच्या घडीला सरकारची प्राथमिकता आहे असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केले आहे. मुंबईतील वाढणारी रुग्णसंख्या पाहता पुढील दोन-तीन महिने आव्हानात्मक आहे अशी चिंता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. हीच चिंता संपूर्ण राज्याची आहे. पण विरोधी पक्ष या चिंताजनक परिस्थितीवर सभागृहात धडपणे चर्चा करू देतील का? असा सवाल अग्रलेखात विचारण्यात आला आहे.

मुंबई पोलिस ‘माफिया’ आहे, असे विधान करणाऱ्यांचीच चौकशी व्हायला हवी

दरम्यान, गृहमंत्री देशमुख, मुंबईचे पोलिस आयुक्त आणि संपूर्ण पोलीस दलावर विधानसभेने विश्वास व्यक्त करणे गरजेचे आहे. मुंबई पोलिस ‘माफिया’ आहे, असे विधान करणाऱ्यांचीच चौकशी व्हायला हवी, अशी मागणी शिवसेनेने अग्रलेखातून केली आहे.