आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Kangana Twitter Blocked: Kangana Twiiter Account Suspended For Violent Tweets Regarding West Bengal Incidents And 2002 Riots News And Updates

भडकाऊ ट्विटवर कारवाई:मोदीजी 2000 च्या दशकातील 'विराट रूप' दाखवा म्हणणाऱ्या कंगनाचे ट्विटर अकाउंट सस्पेंड; पश्चिम बंगालच्या घटनांवर केल्या होत्या भडकाऊ पोस्ट

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंसक आणि भडकाऊ पोस्टमुळे भाजप समर्थक अभिनेत्री कंगना रनोटचे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या घटनांवर तिने एक ट्विट केले होते. सोबतच, एक व्हिडिओ देखील जारी केला होता. त्यामध्ये तिने पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी समर्थकांकडून हिंसाचार वाढल्याचे म्हटले होते. एवढेच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले 2002 चे विराट रूप दाखवून द्यावे असे शब्द वापरले होते. त्यानंतर तिचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले.

नेमके काय म्हणाली कंगना?
कंगनाने पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या घटनांवर ट्विट केले होते, की "हे अतिशय भयंकर आहे. गुंडगिरीला मारण्यासाठी आपल्याला महागुंडगिरी आणायला हवी. ती एक राक्षसी आहे. तिला नियंत्रणात आणण्यासाठी मोदीजींना आपल्या 2000 च्या दशकातील विराट रूप दाखवावे लागेल." यासोबत तिने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारा एक हॅशटॅग सुद्धा वापरला. याच ट्विट आणि एका व्हिडिओमुळे कंगनावर ट्विटरने कारवाई केली.

रडतानाचा व्हिडिओ सुद्धा केला होता जारी

कंगनाने यासोबत एक व्हिडिओ सुद्धा जारी केला होता. त्यामध्ये ती रडून हिंदूंवर अत्याचाराचे आंतरराष्ट्रीय षडयंत्र रचले जात असल्याचा दावा केला होता. कुठलेही माध्यम हे दाखवत नाही. असे मुद्दाम केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारने यावर काही करायला हवे. सरकार देशद्रोह्यांना घाबरते की काय असेही तिने व्हिडिओमध्ये रडता-रडता म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...