आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा एकदा वादात सापडली कंगना:फसवणूक आणि कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंगना रनोट आणि रंगोली चंदेलविरोधात मुंबईत गुन्हा दाखल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या, काय आहे प्रकरण?

अभिनेत्री कंगना रनोट हिच्या विरोधात फसवणूक आणि कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेखक आशिष कौल यांच्या तक्रारीवरून मुंबईच्या एका न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. कंगनासह तिची बहिण रंगोली चंदेल, कमलकुमार जैन आणि अक्षत रनोट यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

‘दिद्दा – द वॉरियर क्वीन ऑफ काश्मीर’ या पुस्तकाचे लेखक आशिष कौल यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा नोंदविला आहे. लेखक आशिष कौल यांनी आरोप केला आहे की, कंगनाने आपल्या ‘कश्मीर की योद्धा रानी दिद्दा’ या आगामी चित्रपटात माझी कथा चोरली आहे. तिने कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केले आहे. कौल म्हणाले की, लोहारची (पुंछ) राणी दिद्दा यांच्या कथेचे विशेष कॉपीराइट माझ्याकडे आहेत. कंगनाने माझी परवानगी न घेताच तिचा वापर केला आहे.

आशिष कौल यांनी त्यांच्या पुस्तकातील कथेचा काही भाग ई-मेलद्वारे कंगनाला पाठवला होता. कंगनाने या कथेचा भाग वापरून आगामी चित्रपटाची सोशल मीडियावरुन घोषणा केली. मात्र चित्रपटाची घोषणा करण्यापूर्वी कंगनाने कथेचे मुळ लेखक असलेल्या आशिष कौल यांच्याकडे परवानगी मागितली नव्हती. त्यामुळे आशिष यांनी कंगनाविरोधात अंधेरी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाने कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलिसांना दिला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...