आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कांजूरमार्ग कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.
काही भिंतींवर "थूकना मना है" लिहिलेले असते..
— nitesh rane (@NiteshNRane) December 16, 2020
तिथेच लोक जास्त थुंकतात..
ठाकरे सरकारच तेच झालं आहे!!#MetroCarShed #aarey
मेट्रोच्या कांजूरमार्ग कारशेडला जैसे थे परिस्थितीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. यावरुन नितेश राणेंनी ट्विट करुन राज्य सरकारला टोला लगावला आहे. 'काही भिंतींवर “थूकना मना है” लिहिलेले असते..तिथेच लोक जास्त थुंकतात..ठाकरे सरकारच तेच झालं आहे,' असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे.
उच्च न्यायालयाचा निर्णय
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारने चपराक दिली आहे. कांजूर मेट्रो कारशेडचे काम त्वरित थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा असे आदेश न्यायालयाने आज (बुधवार) एमएमआरडीएला दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी फेब्रुवारीत होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
या प्रकल्पासाठी जमीन हस्तांतरणाच्या आदेशात अनेक त्रुटी आहेत. म्हणून राज्य सरकारने एकतर ते मागे घ्यावे, अन्यथा आम्ही ते रद्द करू आणि सर्व पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा आदेश जारी करण्यास सांगू. असे याआधी 102 एकरमध्ये उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाबाबत न्यायालयाने म्हटले होते. सरकारने कोणताही निर्णय घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.