आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Kanjur Marg Metro Carshed News And Updates '... Who Is Responsible For That? Thackeray Government Should Apologize '; Kirit Somaiya Criticizes The Government

मेट्रो कारशेड:'...त्यासाठी जबाबदार कोण? ठाकरे सरकारने माफी मागावी'; किरीट सोमय्या यांची सरकारवर टीका

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे हायकोर्टाचे निर्देश

उद्धव ठाकरे सरकारला मोठा झटका बसला आहे. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, या निर्णयानंतर ठाकरे सरकारने माफी मागावी आणि आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्या म्हणाले की, 'उद्धव ठाकरे सरकारला मेट्रो कारशेडची अनधिकृत ऑर्डर मागे घ्यावी लागली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागावी आणि पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. कारशेडच्या जागेच्या वादामुळे मेट्रो प्रकल्प रखडणार आहे. त्यासाठी 5 हजार कोटींचा अधिक खर्च आणि पाच वर्षांचा अधिक काळा लागणार आहे. त्यासाठी जबाबदार कोण असणार?', असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

उच्च न्यायालयाचा निर्णय

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारने चपराक दिली आहे. कांजूर मेट्रो कारशेडचे काम त्वरित थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा असे आदेश न्यायालयाने आज (बुधवार) एमएमआरडीएला दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी फेब्रुवारीत होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

या प्रकल्पासाठी जमीन हस्तांतरणाच्या आदेशात अनेक त्रुटी आहेत. म्हणून राज्य सरकारने एकतर ते मागे घ्यावे, अन्यथा आम्ही ते रद्द करू आणि सर्व पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा आदेश जारी करण्यास सांगू. असे याआधी 102 एकरमध्ये उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाबाबत न्यायालयाने म्हटले होते. सरकारने कोणताही निर्णय घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने एकही रुपया न घेता ही जागा MMRDA ला दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, आता केंद्र सरकारने या जागेत मिठागार असल्याचे सांगत त्यावर आपला हक्क सांगितला आहे. केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि व्यापार मंत्रालयाने राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात कांजूरमार्गची जागा MMRDA ला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...